अमेरिकेतील प्राध्यापकाने मुलांना ‘तालिबान आतंकवादी का नाही ?’, या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले !

  • अमेरिकेमध्येही विविध क्षेत्रांत ‘तालिबानीप्रेमी’ अस्तित्वात आहेत, याचे उदाहरण ! जर अमेरिकेत शिकवणारे प्राध्यापक तालिबानीप्रेमी असतील, तर त्याचे भविष्य काय असेल, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक
  • अमेरिकेतील बुद्धीजिवी जर तालिबानीप्रेमी असतील, तर ते भारतद्वेष्टे नक्कीच असतील, हेही लक्षात घ्या ! अशांचा ‘वैचारिक समाचार’ घेण्यासाठी भारतियांनी सदैव सिद्ध रहाणे आवश्यक ! – संपादक

पेनसिल्व्हेनिया – अमेरिकेतील ‘पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी’च्या आंतरराष्ट्रीय राजकारण विभागाचे प्राध्यापक क्रिस्टोफर कूक यांनी त्यांच्या वर्गातील मुलांना ‘तालिबान संघटना आतंकवादी का नाही ?’, या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले.

सौजन्य : Fox News

कूक यांनी मुलांना गृहपाठ देतांना म्हटले होते, ‘तालिबान ही अद्याप आतंकवादी संघटना नाही, हे स्पष्ट करा. तुम्हाला हे उत्तर लिखित स्वरूपात द्यायचे असून अन्य कोणत्याही प्रकारे देण्याची अनुमती नाही. हा गृहपाठ टाळण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न केल्यास अथवा वाद घालण्याचा प्रयत्न केल्यास अनुत्तीर्ण करण्यात येईल.’ ‘तालिबान ही अमेरिकेची निर्मिती आहे’, असे मानणारे आतंकवाद्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात अमेरिकेत आहेत’, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. क्रिस्टोफर कूक यांच्या या कृतीमुळे ‘ते अमेरिकेतील मुलांना काय शिकवत आहेत’, असा प्रश्‍नही लोकांकडून विचारला जात आहे.