बालभारतीच्या पुस्तकातील ‘ईदगाह’ नावाचा धडा अभ्यासक्रमातून वगळा ! – ब्राह्मण महासंघ, पुणे

सौजन्य: हिंदुस्थान पोस्ट

पुणे – बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ नावाचा धडा आहे आणि हा धडा विशिष्ट समाजाचे संबोधन करणारा असून बालभारतीच्या पुस्तकात एका धर्माविषयी धडा कसा असू शकतो ? विशिष्ट धर्माचे सण, चालीरीती का शिकवले जात आहेत ? त्याचा अभ्यास आम्हाला का करावा लागत आहे ? आपण जर आपल्या देशाला धर्मनिरपेक्ष म्हणत असाल, तर मग याच पुस्तकात गीता, दिवाळी, दसरा, वेद मंत्र यांचा अभ्यास का नाही ? असे प्रश्न अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विचारले आहेत, तसेच हा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. (हिंदूबहुल भारतात अशी मागणी करावी लागणे लज्जास्पद ! – संपादक)

बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘ईदगाह’ या धड्याचा समावेश आहे. पाठ्यपुस्तकातील धड्यावरून सामाजिक माध्यमात उलटसुलट चर्चाही चालू झाल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने पाठ्यपुस्तकातून हा धडा वगळावा, अशी मागणी केली आहे.