रामनगर (कर्नाटक) येथे ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ उभे रहाणार

असे संस्कृत विश्‍वविद्यालय प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये असले पाहिजे. यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार यांनी प्रयत्न करावेत, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यात असलेल्या तिप्पसंद्र गावात १०० एकर भूमीवर ३२० कोटी रुपये खर्च करून ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ बांधण्यात येणार आहे. याचा शिलान्यास मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या विश्‍वविद्यालयात विद्यार्थी संस्कृत भाषेसह आधुनिक शिक्षणही घेऊ शकणार आहेत. १० वर्षांपूर्वी संस्कृत विश्‍वविद्यालयासाठी १०० एकर भूमी संमत होऊन देखील काही तांत्रिक कारणांनी जागेच्या हस्तांतरणाला विलंब झाला. या विश्‍वविद्यालयामध्ये तर्क, विमर्श (परीक्षण), अर्थशास्त्र, योग, आयुर्वेद वैद्य प्रशिक्षण, देशी वनौषधी, वैदिक गणित, शिक्षक प्रशिक्षण केंद्र, बृहत् ग्रंथालयनिर्मिती यांच्यासह अनेक विभाग असणार आहेत.