गोवा : कळंगुट परिसरातील ‘डान्स बार’, वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थ व्यवसाय बंद करा !

स्थानिकांच्या मते ‘डान्स बार’ हा मोठा रोग असून तो पंचायत क्षेत्रात पसरलेला आहे. या रोगावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सहन करावे लागतील !

अंबरनाथ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्‍या तिघांना अटक !

अंबरनाथ परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्‍या रवि मुन्‍नीलाल जैस्‍वाल (वय ३५ वर्षे), हसून कय्‍युम खान (वय २५ वर्षे) आणि महंमद शॅडं रियाझ (वय २७ वर्षे) यांना ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाच्‍या गुन्‍हे शाखेने अटक केली आहे.

मेक्सिकोमध्ये चकमकीत १९ तस्कर आणि १० सैनिक ठार

अमली पदार्थ माफिया आणि सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये १० सैनिक आणि १९ अमली पदार्थ तस्कर ठार झाले. अमली पदार्थ तस्करांनी जाळपोळ केली आणि रस्ते बंद केले.

शस्त्रास्त्रे आणि ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ वाहून नेणारी पाकिस्तानी नौका कह्यात !

भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांचे वाढते जाळे नष्ट करण्यासाठी पाकला संपवणे आवश्यक !

पुणे शहरात चालू वर्षी अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ !

सांस्कृतिक वारसा असणार्‍या पुण्यासारख्या शहरात अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ होणे, हे संस्कृती नष्ट होत चालल्याचे द्योतक. तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापासून थांबवण्यासाठी अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी  ‘सनबर्न’ महोत्सवाला दिलेली मान्यता रहित करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये.

न्यूझीलंडमध्ये १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्यांना सिगारेट खरेदीवर बंदी

हा कायदा जरी करण्यात आला, तरी जे या दिनांकापूर्वी जन्मलेले आहेत, ते सिगारेट खरेदी करून या दिनांकानंतर जन्मलेल्यांना देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

१० ते १७ या वयोगटांतील १ कोटी ५८ लाख मुले व्यसनाधीन ! – केंद्र सरकारने दिली सर्वोच्च न्यायालयाला माहिती

हे चित्र स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! मुलांना जर लहानपणापासूनच साधना शिकवली गेली असती, तर मुले सदाचरणी बनली असती !

८ वर्षांपासून पुण्यात तस्करी करणार्‍या नायजेरियन नागरिकाकडून २ कोटी रुपयांचे ‘कोकेन’ जप्त !

फॉलरिन हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ‘कोकेन’ विक्री करतांना त्याला अटक केली होती.

व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण कसे नाही ? त्यांची संख्या लाखोंच्या घरात जाईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ?