पंजाबमध्ये पाकिस्तानी तस्करांशी भारतीय सैनिकांची चकमक

गुरदासपूर येथील भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी तस्कर यांच्यात चकमक उडाली. हे तस्कर अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. ते पाईपद्वारे भारताच्या सीमेमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रे पोचवत होते.

रासायनिक ताडीच्‍या विक्रीवर बंदी हवीच !

सोलापूर जिल्‍ह्यात ३२ सहस्र झाडांची नोंद असलेली संख्‍या पुढील ४ वर्षांत ३८ सहस्र झाली. केवळ ४ वर्षांत ६ सहस्र ताडी उत्‍पादनक्षम झाडे कुठून आणि कशी वाढली ? त्‍यामुळे प्रशासन जिल्‍ह्यात ३८ सहस्र ताडीची झाडे असल्‍याचे भासवत असून नागरिकांच्‍या जीवाशी खेळण्‍याचाच हा प्रकार आहे.

पुणे येथे १ लाख विद्यार्थ्‍यांनी घेतली व्‍यसनमुक्‍तीची शपथ !

दुःख पचवण्‍याची शक्‍ती नसल्‍याने व्‍यसनांच्‍या आहारी जाणार्‍या आजच्‍या पिढीसमोर १ लाख विद्यार्थ्‍यांनी व्‍यसनमुक्‍तीची शपथ घेऊन आदर्श निर्माण केला आहे ! सर्वच विद्यार्थ्‍यांनी याचे अनुकरण करून सक्षम व्‍हावे !

३३ कोटी ६० लाख रुपयांचे कोकेन बाळगणार्‍या प्रवाशास अटक !

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रकार

गेवराई (बीड) येथे विक्रीसाठी आलेला २५ किलो गांजा जप्‍त !

गांजाची विक्री करणार्‍यांची पाळेमुळे नष्‍ट करण्‍यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत!

काशीमीरा (जिल्‍हा ठाणे) भागात अमली पदार्थाच्‍या विक्रीसाठी आलेल्‍या धर्मांधास अटक !

काशीमीरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील काशीमीरा महामार्गावरील श्री सगणाईदेवी मंदिराच्‍या परिसरात मॅफेड्रॉन (एम्.डी.) हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्‍या फहीम करीम खान याला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.

तरुणांकडून ‘कुत्ता गोळी’ या अमली पदार्थांच्या वापरात वाढ !

अमली पदार्थ उपलब्ध होतातच कसे ? त्यांची निर्मिती करणार्‍या आणि ती उपलब्ध करणार्‍यांवरही कठोर कारवाई करा !

गोवा राज्यात आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक !

आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक ! तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे !

गोवा : कळंगुट परिसरातील ‘डान्स बार’, वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थ व्यवसाय बंद करा !

स्थानिकांच्या मते ‘डान्स बार’ हा मोठा रोग असून तो पंचायत क्षेत्रात पसरलेला आहे. या रोगावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सहन करावे लागतील !

अंबरनाथ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्‍या तिघांना अटक !

अंबरनाथ परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्‍या रवि मुन्‍नीलाल जैस्‍वाल (वय ३५ वर्षे), हसून कय्‍युम खान (वय २५ वर्षे) आणि महंमद शॅडं रियाझ (वय २७ वर्षे) यांना ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाच्‍या गुन्‍हे शाखेने अटक केली आहे.