हिंदुहितैषी निर्णय स्वागतार्ह !

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुहितैषी निर्णयांचा जो धडाका लावला आहे, तो प्रत्येक हिंदूला हर्षाेल्हासित करणारा आहे. हे निर्णय होऊ न देण्यासाठी अनेक विरोधक आटापिटा करतील. अर्थात् हिंदूंनीही मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याचे दायित्व पार पाडावे. हे त्यांचे धर्मकर्तव्यच आहे !

(म्हणे)औरंगजेबाने मंदिरांना संपत्ती दिली !

औरंगजेबाने हिंदूंची असंख्य मंदिरे पाडली, हे ऐतिहासिक तथ्य नाकारून मौलाना तौकीर रझा खान हे स्वत:ला इतिहासकारांपेक्षा अधिक शहाणे असल्याचे दाखवत आहेत का ?

(म्हणे) ‘चार मिनार नमाजपठणासाठी उघडा आणि अवैध भाग्यलक्ष्मी मंदिर बंद करा !’

चार मिनार हे भाग्यलक्ष्मीचे मंदिर आहे. त्यामुळे चार मिनारचा पूर्ण परिसर हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे खान यांची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !

हिंदूंची बळकावलेली सर्व मंदिरे परत मिळवण्यासाठी सरकारने केंद्रीय कायदा करायला हवा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास अभ्यासक

‘कुतूबमिनार हे हिंदू आणि जैन यांची २७ मंदिरे पाडून बनवण्यात आले आहे’, असे भारतीय पुरातत्व विभागाने स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटलेले आहे; मात्र या पुस्तकातील तथ्याच्या विरोधातील भूमिका त्यांनी न्यायालयात घेतली आहे. या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘टीलेवाली मस्जिद’ हिंदूंचे पूर्वीचे मंदिर !

अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सांगितले की, टीलेवाली मशिदीचा पूर्ण परिसर शेषनागेस्थ टीलेश्‍वर महादेवाचे स्थान आहे. ते औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आले होते.

ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरण सार्वजनिक करण्यास प्रतिबंध करावा ! – मुसलमान पक्षाची न्यायालयाकडे मागणी

जर हे चित्रीकरण सार्वजनिक झाले, तर संपूर्ण जगालाच हे ठाऊक होणार आहे की, ज्ञानवापी मशीद नसून पूर्वीचे काशी विश्‍वनाथ मंदिर आहे !

देशातील प्रत्येक मशिदीचे सर्वेक्षण करावे ! – भाजपचे आमदार

भाजपच्या आमदारांनी अशी मागणी करण्यासह केंद्रात त्यांच्या पक्षाची सत्ता असल्यामुळे ‘भारतातील प्रत्येक मशिदीच्या सर्वेक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा’, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

कुतूबमिनारच्या परिसरात पूजा करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही ! – पुरातत्व विभाग

कुतूबमिनारच्या परिसरात पूजा करण्याचा अनुमती मिळावी, यासाठी येथील साकेत न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या हिंदु पक्षाच्या याचिकेवर २४ मे या दिवशी सुनावणी झाली.

(म्हणे) ‘कुतूबमिनार मंदिरांच्या अवशेषांपासून बनवलेले आहे !’ – इतिहासकार इरफान हबीब

कुतूबमिनार कोणत्याही अवशेषपासून बनवलेले नसून ते पूर्वीच हिंदु राजाने बांधलेली मूळ संरचनाच आहे. तो इतिसहाकार आणि पुरातत्व तज्ञ ‘सूर्यस्तंभ’ असल्याचे सांगत आहेत.

शहरांचे नामकरण कधी ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि इस्लामपूर या शहरांचे नामकरण देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही होत नसेल, तर आपण छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करू शकू का ? त्यांच्यासारखा पराक्रम गाजवू शकू का ?