हिंदूंची बळकावलेली सर्व मंदिरे परत मिळवण्यासाठी सरकारने केंद्रीय कायदा करायला हवा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास अभ्यासक

‘ताजमहल नव्हे ‘तेजोमहालय’, कुतूबमिनार नव्हे ‘विष्णुस्तंभ’ !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – कुतुबुद्दीन ऐबकने कुतूबमिनार बांधला, हा धादांत खोटा प्रचार आहे, हे अनेक पुराव्यांच्या आधारे सिद्ध होऊ शकते. प्रसिद्ध इतिहासकार आदरणीय पु.ना. ओक यांनी केलेल्या संशोधनामुळे ‘ताजमहल’ नव्हे, तर ‘तेजोमहालय’ असे आपण ठामपणे म्हणू शकतो. शाहजहानने ताजमहाल बनवला, याचे काहीही पुरावे नाहीत. इस्लामी आक्रमकांनी हिंदूंची सहस्रो मंदिरे तोडली, तसेच बळकावली. एक-एक मंदिरासाठी ३०-३५ वर्षे न्यायालयीन लढा देण्यापेक्षा संसदेत हिंदूंची मंदिरे परत मिळवण्यासाठी सरकारने एक केंद्रीय कायदा करायला हवा. हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे बहुमत असल्याने हे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक तथा अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले.

अधिवक्ता सतीश देशपांडे

ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ताजमहल नव्हे ‘तेजोमहालय’, कुतूबमिनार नव्हे ‘विष्णुस्तंभ’ !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादत बोलत होेते.

श्रीमती नीरा मिश्रा

सरकारने हिंदूंच्या मंदिरांचे संशोधन करून ती सर्वांसाठी खुले करायला हवीत ! – नीरा मिश्रा, संस्थापिका, द्रौपदी ड्रिम ट्रस्ट

भारतीय पुरातत्व विभागाने वर्ष १९७० पासून आजपर्यंत इंटॅक आणि आगाखान कमिटी यांच्या अधीन राहून काम केले. दुसरीकडे पाठ्यपुस्तकांतून खोटा इतिहास हिंदूंच्या माथी मारला. आमच्या मंदिरांच्या आणि इतिहासाच्या स्मृती काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केला गेला. सरकारने हिंदूंचा ऐतिहासिक वारसा आणि मंदिरे यांचे संशोधन करून ते सर्वांसाठी खुले करायला हवे; मात्र देशातील पुरातत्व विभागही राजकारणात अडकला आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळे अनेक हिंदू वास्तू ज्या परकीय आक्रमकांनी कह्यात घेतल्या आहेत, त्या आजही तशाच आहेत.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की…

🚩 ताजमहल नहीं तेजोमहालय, कुतुब मीनार नहीं विष्णुस्तंभ !!

 _______________________________________________

अधिवक्ता अमिता सचदेवा

पुरातत्व विभागाने कुतूबमिनारविषयी न्यायालयात घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात हिंदूंनी आवाज उठवावा ! – अधिवक्ता अमिता सचदेवा, दिल्ली उच्च न्यायालय

आज जी धार्मिक स्थळे इस्लामी शासकांनी उभारल्याचे सांगितले जात आहे, ती प्रत्यक्षात हिंदूंची प्राचीन धार्मिक स्थळे आहेत. हे बहुतेक हिंदूंना ठाऊकच नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये याविषयी जागृती करायला हवी. आज मंदिरांमधील पैसा सरकारी भ्रष्टाचारासाठी वापरला जात आहे. याला हिंदूंनी विरोध करायला हवा. ‘कुतूबमिनार हे हिंदू आणि जैन यांची २७ मंदिरे पाडून बनवण्यात आले आहे’, असे भारतीय पुरातत्व विभागाने स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटलेले आहे; मात्र या पुस्तकातील तथ्याच्या विरोधातील भूमिका त्यांनी न्यायालयात घेतली31 आहे. या विरोधात आवाज उठवला पाहिजे.