(म्हणे)औरंगजेबाने मंदिरांना संपत्ती दिली !

मौलाना (इस्लामी विद्वान) तौकीर रझा खान यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !

नवी देहली – हिंदू औरंगजेबाचा द्वेष करतात. मी तर असे म्हणीन की, औरंगजेबाचा द्वेष केलाच पाहिजे; कारण त्याने हिंदूंना सुधारले, त्याने मंदिरांना संपत्ती दिली. यामुळेच हिंदू नाराज आहेत. पूर्ण जगामध्ये औरंगजेबहून चांगले पात्र कुणीही नसेल, असा जावईशोध मौलाना तौकीर रजा खान यांनी लावला आहे.

अक्षय कुमार वाराणसी येथे ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ चित्रपटाच्या प्रसारार्थ नुकतेच येऊन गेले. त्यांनी इतिहासाच्या पुस्तकांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत म्हटले होते, ‘मी पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी अधिक प्रमाणात जाणून घेण्यास उत्सुक होतो; परंतु इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपल्या महान (हिंदु) राजांविषयी काही सांगण्यात आलेले नाही. (मुसलमान) आक्रमणकार्‍यांविषयी पुष्कळ विवरण आहे; परंतु आपली संस्कृती आणि राजे यांच्याविषयी विशेष काही उल्लेखच नाही. मुलांनी महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी जाणून घ्यायला हवे.’ या पार्श्‍वभूमीवर खान म्हणाले की, अभिनेते अक्षय कुमार केवळ प्रसिद्धीसाठी सर्व करत आहेत. ३ जून या दिवशी अक्षय कुमार यांनी भूमिका वठवलेल्या ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ या हिंदी चित्रपट भारतभरात प्रसारित झाला. योगी आदित्यनाथ शासनाने उत्तरप्रदेशात चित्रपटाला करमुक्त केले आहे.

संपादकीय भूमिका

  • असंख्य देशी-विदेशी इतिहासकारांनी औरंगजेबाचे क्रौर्य सप्रमाण सिद्ध केले आहे. त्याने हिंदूंची असंख्य मंदिरे पाडली, हे ऐतिहासिक तथ्य नाकारून मौलाना तौकीर रझा खान हे स्वत:ला इतिहासकारांपेक्षा अधिक शहाणे असल्याचे दाखवत आहेत का ?
  • खोटा इतिहास सांगून इस्लामी आक्रमकांचा उदो उदो करणार्‍या अशा नेत्यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !