ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरण सार्वजनिक करण्यास प्रतिबंध करावा ! – मुसलमान पक्षाची न्यायालयाकडे मागणी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीचे न्यायालय आयुक्तांद्वारे सर्वेक्षणाच्या वेळी केलेले चित्रीकरण ३० मे या दिवशी हिंदु आणि मुसलमान या दोन्ही पक्षांना न्यायालयाच्या आदेशानंतर देण्यात येणार आहे. हे चित्रीकरण सार्वजनिक करण्यात येऊ नये, असा आग्रह आता मुसलमान पक्षाकडून धरला जात आहे.

न्यायालयात तशी मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

जर हे चित्रीकरण सार्वजनिक झाले, तर संपूर्ण जगालाच हे ठाऊक होणार आहे की, ज्ञानवापी मशीद नसून पूर्वीचे काशी विश्‍वनाथ मंदिर आहे. त्यामुळेच मुसलमान पक्ष याला विरोध करत आहेत, हे लक्षात घ्या !