पुण्यातील ‘छोटा शेख’ आणि ‘बडा शेख’ हे दर्गे, म्हणजे पुण्येश्वर अन् नारायणेश्वर मंदिर !

एकेक हिंदुत्वनिष्ठ किंवा संघटना यांना मंदिरे मुक्त करण्याची मागणी करावी लागण्यापेक्षा केंद्र सरकारने देश पातळीवर एक कायदा करून अशी मंदिरे मुक्त करण्यासाठी पावले उचलणे अधिक सयुक्तिक ठरेल. तशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !

ज्ञानवापी, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर आणि दत्त संप्रदाय यांचा एकमेकांशी असलेला संबंध

चौथ्यांदा ज्ञानवापी स्नान करून शृंगारसौभाग्यगौरी दर्शन सांगितले आहे. अशा प्रकारे ५ वेळा ज्ञानवापीमध्ये स्नान सांगितले आहे आणि येथील नंदी समोर जे शिवलिंग आहे, त्याचे नाव आहे ज्ञानेश्वर ! अशा प्रकारे गुरुचरित्रात ज्ञानवापी, ज्ञानेश्वर आणि नंदिकेश्वर असाच उल्लेख त्यात आढळतो.

औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधा ! – भाजपचे नेते आफताब आडवाणी

आज जे काही होत आहे, ते सर्व औरंगजेबामुळे होत आहे. औरंगजेबाने लाखो हिंदूंची हत्या केली आणि लुटमार केली. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे असणार्‍या औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधण्यात आले पाहिजे

धार्मिक स्थळाचे स्वरूप ठरवण्याच्या प्रयत्नास प्रतिबंध करता येत नाही !

मंदिरांच्या ठिकाणी मशिदी बांधल्याच्या वक्तव्यांना विरोध करण्याचा प्रयत्न मुसलमान पक्षाकडून केला जात आहे, त्याला यामुळे चाप बसला आहे ! हिंदूंनी आता त्या सहस्रो धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाची मागणी केली पाहिजे जी मूळची हिंदूंची आहेत !

हिंदूंनी ज्ञानवापी कह्यात घ्यावी ! – तस्लिमा नसरीन

देश-विदेशातील किती मुसलमान सत्य इतिहास मान्य करून असे सांगण्याचे धाडस करत आहेत ? या प्रश्नाचे ‘एकही नाही’, असेच उत्तर मिळते ! याचाच अर्थ धर्मनिरपेक्षता आणि अन्य धर्मांचा आदर केवळ हिंदूंनी करायचा अन् अन्यांनी हिंदूंवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आघात करायचे असाच होतो, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?

ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !

औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

कुतूबमिनार नव्हे, सूर्यस्तंभ !

देश ‘स्वच्छ’ होण्याचा ध्यास घेतलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आता पुरातत्व विभागही स्वच्छ करण्यासाठी हा विभाग विसर्जित करून तेथे धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, खऱ्या इतिहासतज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे झाल्यास भारताचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर येण्यास वेळ लागणार नाही आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले ते एक पाऊलच असेल !

पर्यटकांना औरंगजेबाच्या थडग्याला ५ दिवस देता येणार नाही भेट !

केवळ ५ दिवसच कशाला ? क्रूरकर्म्याच्या थडग्याला भेट देण्याचा प्रकार कायमचाच बंद करा !

देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती असून त्या बाहेर काढाव्यात !

आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळले, त्याप्रमाणे गोव्यातही आढळू शकते ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

‘पोर्तुगीज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ही मंदिरे पुन्हा उभारावी, असे केवळ माझे वैयक्तिक मत नसून सर्वांचीच तशी भावना आहे.’’