कारखाना माझ्‍या कह्यात मिळाला पाहिजे ! – शालिनीताई पाटील, संस्‍थापिका अध्‍यक्षा, जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना

जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्‍याची किंमत १०४ कोटी रुपये असतांना हा कारखाना कवडीमोल भावात विकण्‍यात आला असून यात अनधिकृत आर्थिक व्‍यवहार झाला आहे. या व्‍यवहाराला आव्‍हान देणारी याचिका उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट केली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद !

आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, सुनिल कदम, महापालिकेचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त, ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’चे राजीव साळुंखे, ‘फोर्सवन मल्टी सर्व्हिसेस’चे भागीदार आणि कर्मचारी, ‘स्नेहा कॅटरर्स’चे भागीदार, महापालिकेचे अधिकारी या सर्वांचा या गुन्ह्यात उल्लेख केला आहे. हा घोटाळा अनुमाने ६ कोटी ३७ लाख रुपयांचा असल्याचे अन्वेषणामध्ये समोर आले आहे.

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच उत्तरदायी !

तथाकथित विवेकतावादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत आणि नवनवीन आरोपी उभे केले जात आहेत. अशा प्रकारे अन्वेषण भरकटले असतांना माध्यमांमध्ये कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.

माजी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना अटक !

पोलिसांनी खरे यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

नाशिक येथे प्रयोगशाळेतील अधिकार्‍याला लाच घेतल्याप्रकरणी अटक !

सरकारी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अनुजीव साहाय्यक वैभव सादिगले यांना शहरातील एका ‘केटरिंग’ (अन्न पुरवण्याचा व्यवसाय) व्यावसायिकाला ‘पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला आहे’, असा निर्वाळा द्यायचा होता.

न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार असून  न्यायाधीश अधिवक्त्यांनी लिहून दिलेला निर्णयच देतात !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गंभीर आरोप !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन संमत !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ते शिक्षा भोगत होते.

सेतू कार्यालयातील अपहार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार ! – शंभूराज देसाई

सेतू कार्यालयातील अपहारप्रकरणी तहसीलदारांकडे अनेक तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. याची सखोल चौकशी करून तहसीलदारांनी जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्‍याकडे अहवाल दिला आहे; मात्र जिल्‍हाधिकारी सुटीवर असल्‍यामुळे १५ दिवस होऊनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि उपसरपंच यांच्‍यात ग्रामपंचायतीमधील भ्रष्‍टाचारावरून वाद !

जिल्‍ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि माजी उपसरपंच यांच्‍यात भर कार्यक्रमात ग्रामपंचायतीमध्‍ये झालेल्‍या भ्रष्‍टाचारावरून वादावादी झाली.

तळोजा (खारघर) येथे सीमाशुल्‍क विभागाच्‍या अधिकार्‍याची आत्‍महत्‍या !

खारघर येथील तळोजा कारागृहासमोरील तलावात उडी मारून सीमाशुल्‍क विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी मयांक सिंग यांनी आत्‍महत्‍या केली आहे.