खोकसा (जिल्हा नंदुरबार) येथील अवैध लाकूड फर्निचर कारखान्यांवर वन विभागाची धाड !

नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लाकूड तस्करीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यात आंतरराज्यीय मोठ्या टोळीचा समावेश आहे. लवकरच या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, – वन विभागाचे अधिकारी

५ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अटक !

कोरोनाने रुद्र रूप धारण केलेले असतांना अशा प्रकारे लाचखोरी करणार्‍या आरोग्य अधिकार्‍याला कठोर शिक्षा करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी.

सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करणारी याचिका फेटाळली !

आरोप करणारा तुमचा (अनिल देशमुख) शत्रू नव्हता; पण आरोप अशा व्यक्तीने केले आहेत जो जवळपास तुमचा उजवा हातच (परमबीर सिंह) होता. त्यामुळे तुम्हा दोघांची चौकशी झालीच पाहिजे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडताच तहसीलदाराने गॅस शेगडीवर जाळले लाखो रुपये !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !

याला मीच उत्तरदायी !

भ्रष्टाचार, महागाई वगैरे वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत.आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ?

तमिळनाडूमध्ये निवडणुकीपूर्वी एकूण ४२८ कोटी रुपयांचा ऐवज जप्त !

मतदारांना मतदानासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून उघडपणे पैसे वाटले जातात, ही जगजाहीर गोष्ट आहे; मात्र या प्रकरणी कधीही कोणत्याही पक्षावर किंवा उमेदवारावर कारवाई झालेली दिसत नाही, हे भारतियांना लज्जास्पद आहे !

सावंतवाडी तहसील कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारतांना पकडले

महसूल विभागाला महसूल विभागाऐवजी जनतेने (लाच) वसुली विभाग म्हटल्यास चुकीचे ते काय ?

भारतातील सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करा ! – गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव येथील १६ मंदिरे सरकारने कह्यात घेण्याचे ठरवले. तेव्हा मंदिर विश्‍वस्त, पुजारी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केला. याचा परिणाम म्हणून २ दिवसांत हा आदेश सरकारने तात्पुरता स्थगित केला.

गृहमंत्री खंडणी गोळा करत असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप

गृहमंत्री खोटे असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की आहे.

‘कंटेनमेंट झोन’मध्ये लावलेल्या बांबूंचे धुळे महापालिकेने काढले ९५ लाख रुपयांचे देयक !

शहरातील विविध ठिकाणी घोषित केलेल्या ‘कंटेनमेंट झोन’साठी ‘धनलक्ष्मी मंडप डेकोरेटर्स’ला ठेका देण्यात आला होता; मात्र यासाठी लावण्यात आलेल्या बांबूंचे देयक ९५ लाख रुपये काढण्यात आले. प्रत्येकी २८ सहस्र ६०० रुपये इतके देयक एका ‘कंटेनमेंट झोन’साठी लावण्यात आले आहे.