सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कर्नाटकातील ३२ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे. या मंदिरांच्या भूमीचा अपहार, सोने आणि अर्पण केलेले धन याचा हिशोब लागत नाही. दक्षिण कन्नडमधील श्रीमंत देवस्थान कुल्लूर मूकम्बिका मंदिरात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा चालू होता. अशा अनेक मंदिरातील घोटाळे आम्ही उघडकीस आणले. बेळगाव येथील १६ मंदिरे सरकारने कह्यात घेण्याचे ठरवले. तेव्हा मंदिर विश्वस्त, पुजारी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केला. याचा परिणाम म्हणून २ दिवसांत हा आदेश सरकारने तात्पुरता स्थगित केला. मंदिर सरकारीकरणाचा भ्रष्टाचारी कारभार पहाता देशभरात सरकारकडे असलेली मंदिरे भक्तांकडे सोपवा.