|
सावंतवाडी – येथील तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ एप्रिल या दिवशी धाड टाकली. या वेळी पुरुषोत्तम कृष्णा वारंग या लिपिकाला तक्रारदार महिलेकडून ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना कह्यात घेतले.
एका महिलेने एक दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो दाखल देण्यासाठी गेले अनेक मास वारंग टाळाटाळ करत होते, तसेच त्वरित दाखला पाहिजे असल्यास ४ सहस्र रुपयांची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे त्या महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानुसार ५ एप्रिल या दिवशी पथकाने तहसील कार्यालयात सापळा रचून वारंग यांना पैसे स्वीकारतांना कह्यात घेतले. (महसूल विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या विभागाला महसूल विभागाऐवजी जनतेने (लाच) वसुली विभाग म्हटल्यास चुकीचे ते काय ? – संपादक)