तमिळनाडूमध्ये निवडणुकीपूर्वी एकूण ४२८ कोटी रुपयांचा ऐवज जप्त !

भारतातील निवडणुकीमध्ये सहस्रो कोटी रुपयांचा बेहिशोबी व्यवहार केला जातो. मतदारांना मतदानासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून उघडपणे पैसे वाटले जातात, ही जगजाहीर गोष्ट आहे; मात्र या प्रकरणी कधीही कोणत्याही पक्षावर किंवा उमेदवारावर कारवाई झालेली दिसत नाही, हे भारतियांना लज्जास्पद आहे !

प्रातिनिधिक छायाचित्र

चेन्नई (तमिळनाडू) – राज्यात ६ एप्रिलला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले; मात्र निवडणुकीच्या काळात राज्यभरात ४२८ कोटी रुपयांचा बेहिशोबी ऐवज पोलिसांनी जप्त केला, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. या ऐवजामध्ये रोख पैसे, सोने आणि चांदी यांचा समावेश आहे. ४२८ कोटी रुपयांच्या बेहिशोबी ऐवजामध्ये २२२ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम, तसेच १७६ कोटी११ लाख रुपये मूल्याचे सोने आदींचा समावेश आहे.