बुलंदशहर (उत्तरप्रदेश) १०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

यासाठी भाजपच्या आमदार मीनाक्षी सिंह आणि विश्‍व हिंदु परिषदेचे पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या पाद्य्रासह २ जणांना अटक !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर धर्मांध ख्रिस्त्यांना कायद्याचा धाक बसलेला नाही, हे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी शिक्षा आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे !

मध्यप्रदेशात ३०० जणांची, तर छत्तीसगडमध्ये ७० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी !

या हिंदूंना ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले होते. नाताळच्या दिवशीच हा कार्यक्रम पार पडला.

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर (जिल्हा सांगली) बंद !

रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या तरुणीवर बळजोरीने संजय गेळे आणि अश्विनी गेळे या पती-पत्नीने ख्रिस्ती धार्मिक विधी केल्याचा प्रकार केला होता. गेळे दांपत्यांनी केलेल्या या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर २५ डिसेंबरला बंद ठेवण्यात आले.

केरळमध्ये नाताळच्या वेळी २ चर्चमध्ये प्रार्थनेवरून ख्रिस्त्यांच्या गटांत हाणामारी !

‘हिंदु धर्मात जाती-जातींत भेदभाव असून त्यांच्यात वाद होतात’, अशी वृत्ते प्रसारित करणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्त्यांमधील गटबाजी आणि त्यामुळे होणारी हाणामारी याकडे मात्र दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

हिंदु विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवणे, हे त्यांना ख्रिस्ती धर्माकडे वळवण्याचे षड्यंत्र !

कॉन्व्हेंट शाळांत हिंदु विद्यार्थ्यांना टिळा, कुंकू लावण्यास, बांगड्या घालण्यास आदी कृती करण्यास बंदी घातली जाते, तर मग हिंदूंच्या शाळांमधून ख्रिस्त्यांचा सण का साजरा करायचा ?

हिंदूंचे धर्मांतर होत असल्यावरून ३० युवकांकडून नाताळच्या कार्यक्रमावर आक्रमण

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे विविध माध्यमांतून धर्मांतर केले जात आहे, हे जगजाहीर असतांना त्याला अजूनही पायबंद घातला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !

धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !

१८ डिसेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘धर्मशिक्षणाने धर्माचे महत्त्व लक्षात येणे आणि धर्माभिमान निर्माण होणे, धर्मशिक्षणाच्या संदर्भात आजची स्थिती अन् धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान नसणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

मुसलमानांनी ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत ‘ख्रिसमस’च्या शुभेच्छा देऊ नयेत ! – इंडोनेशियाचे मौलवी मारूफ अमीन

हिंदु धर्मीय सोडून अन्य पंथीयांचे धर्मगुरु त्यांना त्यांच्या पंथांनुसार नियमांचे पालन करायला सांगतात. हिंदूंना मात्र सर्वधर्मसमभावाची शिकवण दिल्यामुळे ते धर्मपालन करत नाहीत उलट धर्मविरोधी कृत्ये करण्यास धन्यता मानतात !

महाराष्ट्रात नाताळ आणि ३१ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजल्यानंतरही मद्यविक्रीस सरकारची अनुमती !

त्यामुळे मद्याला विरोध करणार्‍या लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या तिन्ही दिवशी मध्यरात्रीनंतर मद्याची दुकाने उघडी रहाणार असल्यामुळे मद्यप्रेमींचा धुडगूस आणि ध्वनीप्रदूषण शहरात पहायला मिळणार आहे.