सध्या मणीपूर हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे. मणीपूरचे वैष्णव हिंदु असलेल्या मैती समुदायाला (५३ टक्के लोकसंख्या) अनुसूचित जनजातीचा दर्जा म्हणजेच ‘ट्रायबल स्टेटस्’ मिळावा; म्हणून गेली कित्येक वर्षे राज्यात आंदोलने आणि कायदेशीर चळवळी चालू आहेत. अन्य दोन समुदाय तांगखुल आणि अन्य नागा उपजाती (२४ टक्के लोकसंख्या) आणि कुकी-झोमी (कुकी-चीन-मिझो जातीय गट १६ टक्के लोकसंख्या) या २ ख्रिस्तीबहुल जाती आधीच अनुसूचित जनजाती गटात मोडतात. त्यामुळे मैती वैष्णव हिंदु समुदायाला अनुसूचित जनजाती दर्जा देण्याला चर्चप्रणित सगळ्या ख्रिस्ती समुदायांचा पराकोटीचा विरोध आहे.
१. वैष्णव मैती हिंदूंविषयी
मणीपूरच्या वैष्णव हिंदूंची अन्य हिंदूंप्रमाणेच सहस्रो वर्षांची उन्नत संस्कृती आहे. कृष्णभक्तीच्या अवतीभोवती फिरणारी ही अतिशय प्रगल्भ, प्रगत अशी जात आहे आणि ब्रिटीश शासन समर्थित चर्चच्या २०० वर्षांच्या सगळ्या गुंडागर्दीला मैती हिंदु पुरून उरले आहेत. त्यांनी २० वर्षांपूर्वी स्वतःच्या भाषेची लिपी सिद्ध करून ती आता दैनंदिन वापरात आणलेली आहे. नसानसांत भिनलेली कृष्णभक्ती, गावागावांत रुजलेली क्रीडा संस्कृती आणि हाडाची लढाऊ वृत्ती यांमुळे अख्ख्या पूर्वांचलात मणीपूरचे हिंदू उठून दिसतात. भारतीय क्रीडा इतिहासात या चिमुकल्या राज्याने आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत सहस्रो पट अधिक पदके आजपर्यंत मिळवलेली आहेत.
२. मैती हिंदूंना अनुसूचित जनजातीचा दर्जा मिळवू न देण्यामागील कारण
‘अशा मैती हिंदूंना अनुसूचित जनजाती मिळून त्यांनी आपल्या आरक्षणात वाटेकरी होऊ नये आणि आरक्षणापासून वंचित मैती हिंदु आपल्या धर्मांतराच्या जाळ्यात अलगद ओढले जावेत’, यासाठी चर्चप्रणित संघटना सतत मैती हिंदूंना अनुसूचित जनजातीचा दर्जा मिळू नये; म्हणून अविरत प्रयत्न करत असतात. लक्षात घेण्याजोगे म्हणजे मणीपूर संस्थान भारतात विलीन होतांना मैतींना अनुसूचित जनजातीचा दर्जा होता; पण चर्चच्या दबावात येऊन तत्कालीन केंद्र सरकारने तो दर्जा काढून घेऊन फक्त कुकी-नागा यांनाच तो दर्जा कायम ठेवला होता.
३. इंफाळ उच्च न्यायालयाने दिलेला आदेश
मैती हिंदूंना अनुसूचित जमाती (शेड्युल्ड ट्राईब) गटात समाविष्ट करण्यासंदर्भात वर्ष २०१२ मध्ये प्रविष्ट झालेल्या याचिकेवर नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळी इंफाळ उच्च न्यायालयाने मणीपूर राज्य सरकारला आदेश दिला. त्यात उच्च न्यायालयाने म्हटले आहे, ‘राज्य सरकारने २९ मेपर्यंत केंद्रीय जनजाती मंत्रालयाला मैती समुदायाला अनुसूचित जनजाती गटात समाविष्ट करण्यासंबंधी आपल्या शिफारसी सादर कराव्यात.’ या आदेशाने चर्च प्रचंड अस्वस्थ झाले. या आदेशाच्या विरोधात ३ मे २०२३ या दिवशी मणीपूरच्या सर्व १० अनुसूचित जनजातीबहुल जिल्ह्यात ‘ट्रायबल सॉलिडॅरिटी मार्च’ (आदिवासी एकता मोर्चा) आयोजित केले होते.
४. राज्य सरकारच्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात चर्चच्या कारवाया
मागच्या आठवड्यात मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या चुराचांदपूर दौर्याच्या आधी ‘ट्रायबल फोरम’ने (आदिवासी मंचाने) मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त बांधलेले व्यासपीठ आणि अन्य इमारती जाळून खाक केल्या. तसेच जिल्ह्यात पूर्णबंद (टोटल शटडाऊन)ची घोषणा केली. गेल्या काही मासांपासून राज्य सरकार राखीव वनक्षेत्रातून झालेली अतिक्रमणे बळाचा वापर करून मोकळी करत आहे; कारण यात म्यानमारच्या चीन समुदायाचे आतंकवादी गट मणीपुरी कुकींच्या नावाखाली स्वतःचे अड्डे स्थापन करत आहेत. याच्या माध्यमातून चीन आणि कुकी आतंकवादी या जंगली भागात गांजा, अफू आदी अमली पदार्थांचा व्यापार करण्यासह अख्ख्या भारतात तस्करी करतात. सध्या मणीपूर आणि मिझोराम भारतातील अमली पदार्थ व्यापाराची मुख्य उगमस्थाने म्हणून पुढे येण्यामागे ही कारणे आहेत.
म्यानमार सरकारच्या विरोधात सशस्त्र संघर्ष करणारे ख्रिस्ती आतंकवादी गट म्यानमार सैन्याच्या दबावातून मोकळा श्वास घेण्यासाठी ते मणीपूरच्या कुकी भागात घुसू नयेत; म्हणून राज्य सरकार ही मोहीम राबवत आहे. त्याच्या विरोधात चर्च स्वतःची नेहमीची तंत्रे वापरून आगीत तेल ओतत आहे.
५. राज्य सरकारची त्रिपक्षीय युद्धबंदीतून माघार
मणीपूर विधानसभेत कुकी-झोमी गटातून निवडून आलेले १० आमदार आहेत. यांपैकी काही सत्ताधारी भाजपचेही आमदार आहेत. तरीही कुकी लोकांची ‘कुकी नॅशनल आर्मी’ आणि झोमींची ‘झोमी लिबरेशन आर्मी’ राज्य अन् केंद्र सरकार यांच्यात एका दशकापूर्वी त्रिपक्षीय युद्धबंदी करार झाला होता. या जुन्या त्रिपक्षीय युद्धबंदीतून राज्य सरकारने मार्च २०२३ मध्ये माघार घेतल्याने तणाव वाढत होता. इंफाळ उच्च न्यायालयाच्या आदेशाने यात अजून एका कारणाची भर पडली आणि हिंसाचार चालू झाला.
६. चर्चचे षड्यंत्र आणि सामान्य नागरिकांना झळ
चर्चने म्यानमार-चीन वांशिक आतंकवादी संघटनांच्या अमली पदार्थ आणि शस्त्र व्यापाराच्या हितासाठी अन् मणीपूरच्या मैतींना अनुसूचित जनजातीचा दर्जा मिळू नये; म्हणून हा हिंसाचार भडकावला. प्रारंभी अनुसूचित जनजातीबहुल पर्वतीय जिल्ह्यांतून मैती हिंदूंना अचूक आक्रमणांच्या लक्ष्यावर आणून प्रचंड मनुष्यहानी आणि स्थावर मालमत्तेची हानी सहन करावी लागली. त्याची आग लगेच मैती हिंदुबहुल इंफाळ खोर्यात पोचली आणि तिथून कुकी वस्त्या बघता बघता उद्ध्वस्त झाल्या. आजपर्यंत ४० सहस्रांपेक्षा अधिक नागरिक विस्थापित आहेत आणि जम्मू-काश्मीरनंतर बाहेर झालेली सर्वाधिक सैन्य तैनाती गेल्या ८ दिवसांत मणीपूरला झाले आहे. मुंबई, झारखंड, पंजाब, देहली, आसाम इत्यादी ठिकाणांहून वायूसेनेच्या विमानांनी युद्धपातळीवर सैन्य आणि अर्धसैनिक दलांच्या १२० पेक्षा अधिक बटालियन्स मणीपूरला नेल्या आहेत अन् अजूनही नव्या बटालियन्स प्रतिदिन तिथे तैनात केल्या जात आहेत.
७. चर्चच्या उलट्या बोंबा
‘आधी आग लावायची आणि मग आपण पीडित आहोत, अशी बोंब मारायची’, ही चर्च आणि गुंड प्रवृत्तीच्या ख्रिस्ती नेतृत्वाची जुनी सवय आहे. जेव्हा पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मैती हिंदु जळत, विस्थापित होत होते, तेव्हा चर्च याला ‘एथनिक कॉन्फ्लिक्ट’, म्हणजे ‘वांशिक संघर्ष’ म्हणत होते. आता जेव्हा मैती हिंदूंनी इंफाळ खोर्यात चर्च आणि ख्रिस्ती समुदायाला सव्याज परतफेड केली, तेव्हा आता ‘ट्रायबल चर्चेस फोरम मणीपूर’, ‘कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया’ आणि ‘काऊंसिल ऑफ बाप्टिस्ट चर्चेस इन नॉर्थ ईस्ट इंडिया’, हे सगळे एरव्ही आपापसांत उरावर बसणार्या ख्रिस्ती संघटना ‘ख्रिस्ती परसिक्युशन’ म्हणजेच ‘ख्रिस्ती समुदायावर मणीपूरमध्ये सामूहिक अत्याचार’ होत असल्याची आरडाओरडा करत आहेत. लवकरच यात जागतिक ख्रिस्ती समुदाय उडी घेऊन अभियान चालू करील.
८. चर्चचे षड्यंत्र (अजेंडा) उघड करण्याची आवश्यकता !
बुद्धिस्ट राजवटीच्या विरोधात लढणारी ‘म्यानमारी-चीन वांशिक ख्रिस्ती आतंकवादी संघटना’ त्यांचा मणीपूरमधील अवैध अमली पदार्थांचा व्यापार आणि ‘मिझो-मणीपुरी-म्यानमारी ख्रिस्ती आतंकवादी संघटनां’नी संपूर्ण भारतात विणलेले अमली पदार्थांच्या व्यापाराचे मजबूत जाळे यांचे संरक्षण करणे अन् मैती वैष्णव हिंदूंना अनुसूचित जनजातीचा दर्जा नाकारून त्यांचे धर्मांतरासाठी अनुकूल वातावरण सिद्ध करणे, यांसाठी हा भीषण रक्तरंजित खेळ चर्च खेळत आहे. उर्वरित भारतात शिक्षण, आरोग्य, मानवता यांचे पांढरे बुरखे घालून फिरणारे पाद्री, सिस्टर्स हे अव्वल दर्जाचे काळे, उलट्या काळजाचे आणि समाजविघातक गुन्हेगार आहेत. शस्त्र, अमली पदार्थांची तस्करी आणि फुटीरतावादी आतंकवादी गटांना भारतीय सैन्यापासून वाचवण्यासाठी मानवाधिकार उल्लंघनाच्या नावाखाली ढाल पुरवणे आणि गरीब हिंदूंचे धर्मांतर करणे, हे त्यांचे खरे उद्योग आहेत. भारतियांनी याविषयी सावध राहून यांचे षड्यंत्र (अजेंडा) मिळेल त्या माध्यमातून जगासमोर आणले पाहिजे !
– श्री. विनय जोशी (साभार : ‘इन्स्टिट्यूट फॉर कनफ्लिक्ट रिसर्च अँड रिझोल्यूशन’चे संकेतस्थळ, ७.५.२०२३)
संपादकीय भूमिकामणीपूरसह देशात चर्चच्या चालू असलेल्या कारवाया रोखण्यासाठी सरकारने धर्मांतरविरोधी कायदा लवकर करणे अपेक्षित ! |