बिशपच्या बैठकीत महिलांना मिळणार मतदान करण्याचा अधिकार ! – पोप फ्रान्सिस यांचा निर्णय

ख्रिस्त्यांच्या २ सहस्र वर्षांच्या इतिहासतील पहिली घटना !

(बिशप म्हणजे चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेले पाद्री)

पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ऑक्टोबर मासात बिशपच्या होणार्‍या पुढील बैठकीत महिलांना मतदान करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत जगभरातील पाद्री सहभागी होत असतात. अशा प्रकारचा अधिकार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची टीकाही केली जात होती.