४ सहस्र ५०० चर्च झाले बंद !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेमध्ये ख्रिस्ती धर्मियांच्या संख्येत वेगाने घट होत असल्याचे ‘लाईफ वे’च्या अहवालानतून समोर आले आहे. वर्ष १९७० मध्ये अमेरिकेतील ९० टक्के ख्रिस्ती त्यांच्या धर्मावर श्रद्धा ठेवत होते. आता ही संख्या ६४ टक्के इतकी झाली आहे. यामुळे चर्चमध्ये जाणार्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ‘दिव्य मराठी’ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
१. नुकतेच ‘प्यु रिसर्च’मध्ये समोर आले की, ३० आणि ३९ वयाचे एक तृतीयांश अमेरिकी धर्माविषयी उदासीन दिसत आहेत. २० टक्के तरुण चर्चमध्ये जात आहेत; मात्र हा आकडा पुष्कळ अल्प आहे.
२. ‘लाइफ वे’नुसार लोकांनी चर्चमध्ये जाणे बंद केल्यामुळे आतापर्यंत अमेरिकेतील ४ सहस्र ५०० चर्चला टाळे ठोकण्यात आले आहे. वर्ष १९९० मध्ये ३० आणि ३४ वयोगटातील ख्रिस्त्यांमध्ये केवळ एक प्रौढ व्यक्ती नास्तिक झाली होती; मात्र आता नास्तिकांची संख्या तिपटीहून अधिक झाली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्म त्यागून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर होऊ पहाणार्या नतद्रष्ट हिंदूंच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही आकडेवारी आहे. भारतातील ख्रिस्ती मिशनर्यांनीही याविषयी बोलावे ! |