हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पंढरपूर (सोलापूर) – आषाढ वारी २ दिवसांवर आली, तरी पंढरपूर शहरात मद्य आणि मांस यांची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करावीत, अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘या संदर्भात जिल्हाधिकार्यांना तात्काळ आदेश देऊन मद्य आणि मांस यांची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत’, असे सांगितले. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते.
Maharashtra CM orders immediate shut down of liquor and meat shops in Pandharpur during the period of the Ashadhi Wari@HinduJagrutiOrg and the ‘Shivsena Adhyatmik Aghadi’ meets the CM Eknath Shinde@SG_HJS pic.twitter.com/rrF8HKFirn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 15, 2024
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –
१. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सिद्धता पहाण्यासाठी आणि बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर येथे आले होते. त्या प्रसंगी ह.भ.प. अक्षय महाराज भोसले आणि श्री. सुनील घनवट यांनी भेट घेऊन ही मागणी केली.
२. या संदर्भात श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘वास्तविक यापूर्वी अनेक वेळा हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांनी पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण यांसह सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त असावीत, या संदर्भात निवेदन दिले आहे.
All Hindu Organisations and Warkari Community!
15.07.2024 : Press Release!
‘Hindu Janajagruti Samiti’ and ‘Shiv Sena Adhyatmik Aaghadi’ met with the Chief Minister!
The Chief Minister ordered District Collectors to immediately close liquor and meat shops during Ashadhi Wari!… pic.twitter.com/CSTpFdFdaT
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) July 15, 2024
वारकरी संप्रदायानेही या मागणीचा अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. केवळ यात्रा काळात असे बंदीचे आदेश निघतात, त्याचेही पालन प्रशासन योग्य प्रकारे करत नाही. तरी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नोंद घेऊन प्रशासनास आदेश द्यावेत.’’
आषाढी एकादशी 2 दिवसावर आहे लाखो #वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत आणि दारू,मटण-मांसाची दुकाने खुलेआम सुरू आहेत समस्त वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन @CMOMaharashtra व @ChDadaPatil आपल्याकडे यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करत आहोत@Ramesh_hjs @PTI_News @TV9Marathi @ANI pic.twitter.com/zTzvvqZ931
— Sunil Ghanwat🛕🛕 (@SG_HJS) July 14, 2024
३. या प्रसंगी श्री. सुनील घनवट यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊन वारकर्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली.