राष्ट्र आणि धर्माभिमानी बालके हवीत !
‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले.