संस्कार म्हणजे काय ?

आदर्श बालक

संस्कार म्हणजे काय ?

‘संस्कार’म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. ‘गुणांचा गुणाकार’ याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि ‘दोषांचा भागाकार’ याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प करायचे.


आदर्श पिढीमुळे राष्ट्राचा उद्धार होतो ?

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापू शकले; कारण ते स्वतः आदर्श होते. आपणही आदर्श बनलो, तर राष्ट्राचाही उत्कर्ष होईल.


मुलांनो, आदर्श होण्यासाठी या कृतीही करा !

  • दिलेला शब्द आणि दिलेली वेळ यांचे पालन करावे.
  • घरातून बाहेर पडतांना प्रत्येक वेळी देवतांना नमस्कार करावा आणि मोठ्या व्यक्तींना ‘कोठे जात आहे ?’, ते सांगावे.
  • दोन मोठी माणसे बोलत असतांना मध्येच बोलू नये.
  • कुणी भेटल्यावर हसतमुखाने नमस्कार करावा. सर्वांशी नम्रतेने वागावे. वयाने मोठ्या असलेल्या व्यक्ती, तसेच विद्वान आणि संत यांचा आदर करावा.