‘पूर्वीच्या काळी पालक त्यांच्या मुलांना साधना शिकवत. आता सनातनमध्ये आलेले अनेक बाल आणि युवा साधकांच्या बाबतीत लक्षात आले की, ते त्यांच्या पालकांना साधना शिकवत आहेत ! काळाचा परिणाम येथेही दिसून येत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भावभेटीत ‘पुढील ईश्वरी राज्य चालवणारी पिढी कशी घडत आहे ?’ यांविषयी सनातनच्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांनी सांगितलेला अनुभव येथे दिला आहे.
‘पू. (सौ.) शैलजा परांजपेआजींनी सांगितले, ‘‘आम्ही आश्रमात रहात आहोत. आम्हाला सर्वांकडून पुष्कळ शिकायला मिळते. आश्रमात कितीतरी लहान मुले आहेत. त्यांचे आई-वडील आतापासूनच त्यांच्यावर किती चांगले संस्कार करत आहेत ! ती मुले आतापासूनच साधना शिकत आहेत.’’
पू. (सौ.) परांजपेआजींनी एक प्रसंग सांगितला, ‘‘एकदा पू. सदाशिव परांजपेआजोबा आश्रमातील एका लहान मुलाशी बोलत होते. तेव्हा तो मुलगा पू. आजोबांकडे रागाने पहात होता. ते दैवी बालिका कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के, वय ९ वर्षे) हिने पाहिले. थोड्या वेळानंतर कु. आराधना त्या लहान मुलाला पू. आजोबांकडे घेऊन आली आणि तिने त्याला कान पकडून पू. आजोबांची क्षमा मागायला सांगितली.’’ तेव्हा पू. परांजपेआजींना वाटले, ‘या लहान मुलांचे आध्यात्मिक जीवन किती चांगल्या प्रकारे घडत आहे.’‘ईश्वरी राज्य निर्माण करणारी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण दायित्व साधक माता-पिता निभावत आहेत’, असे वाटणे
तेव्हा मला (पू. परांजपेआजींना) वाटले, ‘वर्तमान स्थितीत बालपणापासूनच पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये बुडालेली समाजातील अन्य मुले कुठे ? आणि आश्रमजीवनात रममाण होणारे हे हुशार दैवी बालक कुठे ? आजच्या कलीयुगात केवळ ईश्वरी अधिष्ठानामुळे आश्रमातच असे शक्य आहे.’ तेव्हा मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. आपल्या मुलांवर लहानपणापासूनच संस्कार आणि साधना यांचे बिजारोपण करणारे साधक माता-पिता गुरुदेवांनीच घडवले आहेत. ईश्वरी राज्य चालवण्यासाठी संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण दायित्व ते साधक माता-पिता निभावत आहेत.
– कु. संगीता मेनराय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२२)