बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांची घोषणा

कोलकाता (बंगाल) : मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथे येत्या ६ डिसेंबरला बाबरी मशिदीची पायाभरणी करणार असल्याची घोषणा तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांनी केली. कबीर यांनी गेल्या वर्षी १२ डिसेंबरला मशीद बांधण्याचा शब्द दिला होता.
Appeasement Politics on Full Display
TMC MLA Humayun Kabir announces that the foundation stone for a ‘Babri Masjid’ will be laid on Dec 6 in Beldanga, Bengal.
But remember this:
The Hindu-hating Mamata Banerjee, who blocks Ram Navami yatras, Navratri processions & Hindu… pic.twitter.com/l7EGBokRFf— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 22, 2025
कबीर पुढे म्हणाले,
‘‘मशिदीच्या पायाभरणीच्या या कार्यक्रमाला मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांसह अनुमाने २ लाख लोक उपस्थित रहातील. मुर्शिदाबादसह उत्तर बंगाल आणि बीरभूम जिल्ह्यांतून बरेच लोक येतील. देहली, कोलकाता आणि मुंबई येथूनही अनेक जण येणार आहेत. मशिदीच्या पायाभरणीची सर्व सिद्धता पूर्ण झाली आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. ही मशीद बांधून पूर्ण व्हायला ३ वर्षे लागतील.’’
मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही रहाणार अनुपस्थित !
याच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी या कोलकात्यात एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत. तथापि पायाभरणीच्या कार्यक्रमामुळे पक्षाच्या या सभेला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कबीर यांनी म्हटले आहे. (यावरून मुसलमानांना त्यांच्या पक्षापेक्षा धर्म मोठा असतो, हे लक्षात येते ! – संपादक)
(म्हणे) ‘बाबरी मशीद पाडणे, हे कटकारस्थान होते !’
कबीर पुढे म्हणाले की, बाबरी मशीद पाडणे, हे कटकारस्थान होते. (बाबरी मशीद ही श्रीराममंदिर पाडूनच बांधली गेली होती, हे न्यायालयात सिद्ध झाल्याविषयी मुसलमान नेते काही बोलत का नाहीत ? वादग्रस्त बाबरी मशीद पाडणे, हे कटकारस्थान वाटणार्या कबीर यांना त्यांच्या बांधवांनी श्रीराममंदिर पाडणे, हे योग्य वाटते का ? – संपादक) आम्ही वर्ष १९९२ पासून प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर हा दिवस‘काळा दिवस’ म्हणून पाळत आहोत. तो अतिशय वेदनादायी दिवस असल्यामुळे ते दुःख थोडे अल्प करण्यासाठी या मशिदीची पायाभरणी केली जाणार आहे. |
संपादकीय भूमिका
|
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !