अमली पदार्थ समवेत बाळगल्याचे प्रकरण

पणजी, १४ जुलै (वार्ता.) – इस्रायली नागरिक यानिव बेनाहिन बेनाइम उपाख्य अटाला याला एप्रिल २०२५ मध्ये समवेत चरस आणि कोकेन हे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने अटाला याला उत्तर गोवा अमली पदार्थ प्रतिबंधक न्यायालयाने दिलेला जामीन रहित केला आहे.
अटाला याला उत्तर गोवा अमली पदार्थ प्रतिबंधक न्यायालयाने दिलेल्या जामिनाला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अमली पदार्थ प्रकरणी आरोपी विदेशी नागरिक असल्याने या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील अनिवार्य अटींचा योग्य विचार कनिष्ठ न्यायालयाने केलेला नसल्याचा युक्तीवाद गोवा सरकारने उच्च न्यायालयात केला होता. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कठोर प्रावधानांनुसार जामीन संमत करतांना आवश्यक कारणे नोंदवण्यास कनिष्ठ न्यायालय अल्प पडल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे आणि या प्रकरणी जामीन आदेश रहित केला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी नव्याने सुनावणी करण्याचे निर्देश उत्तर गोवा अमली पदार्थ प्रतिबंधक न्यायालयाला दिले आहेत. या निर्देशानुसार न्यायालयाने जामिनाच्या अर्जावर एका आठवड्याच्या आत नव्याने निर्णय घ्यायचा आहे, तसेच नव्याने निर्णय होईपर्यंत इस्रायली नागरिक अटाला याचा जामीन कायम रहाणार आहे, तसेच त्याच्या स्वातंत्र्यावर कोणतेही निर्बंध घालता येणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !