
पनवेल – खांदेश्वर येथील शंकर मंदिर परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेली बांधकाम, आरोग्य आणि उद्यान यांच्या संदर्भातील कामे चालू करणार असल्याचे लेखी आश्वासन महापालिकेने दिले आहे. ‘परिवर्तन सामाजिक संस्था’ आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी १३ जुलैपासून मंदिर प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणाची चेतावणी दिली होती. त्यानंतर पालिकेने कृती केली.
मंदिर परिसरातील तलावातील गाळ काढणे, वाढलेले गवत आणि झाडांच्या फांद्या छाटणे, स्वच्छतागृह चालू करणे आदी कामे करण्यात येतील. ही कामे होत नसल्याने भाविक आणि स्थानिक नागरिक दीर्घकाळापासून त्रस्त होते.
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !