कबीर यांच्या निर्णयामुळे ममता बॅनर्जी होत्या अप्रसन्न

कोलकाता – मुर्शिदाबाद येथे मुसलमान आक्रमणकर्ता बाबर याच्या नावाने मशीद बांधण्याची घोषणा करणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांना पक्षाने निलंबित केले आहे. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी वादग्रस्त बाबरी ढाचा पाडण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ‘मुर्शिदाबाद येथे ६ डिसेंबरपासून बाबरी मशीद बांधण्यास प्रारंभ करणार’, अशी घोषणा कबीर यांनी केली होती. त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला. कबीर यांच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अप्रसन्न होत्या.
१. बांगालमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी म्हटले की, मुर्शिदाबादच्या आमदारांना बाबरी मशीदच का बांधायची होती ? आम्ही त्यांना याआधीही चेतावणी दिली होती.
२. बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. आमदारकीची उमेदवारी मिळण्यासाठी पक्षावर दबाव आणण्यासाठी कबीर यांनी बाबरी मशिदीच्या बांधकामाचे सूत्र उपस्थित केले; मात्र ‘त्यांनी रचलेला डाव त्यांच्यावर उलटला’, असे बोलले जात आहे.
आमदार कबीर यांचे भावना दुखावण्याचे कारस्थान ! – राज्यपाल
‘आमदार कबीर यांनी मशीद बांधण्याची घोषणा करून धार्मिक भावना दुखावण्याचे कारस्थान रचले आहे. अशी मशीद बांधण्यास अजिबात अनुमती दिली जाणार नाही’, असे बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाममता बॅनजी यांना कबीर यांची कृती पसंत नव्हती, तर त्यांनी त्यांना तात्काळ पक्षातून काढून का टाकले नाही ? कबीर यांचे आता निलंबन करणे, म्हणजे ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’, असेच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? |
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक