
वाल्हे (जिल्हा पुणे) – आषाढी वारीनिमित्त निघणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे (पुणे जिल्हा, पुरंदर तालुका) येथे आगमन अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाले. वाल्हेकर ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक यांनी मोठ्या उत्साहाने फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत केले. या पालखी सोहळ्याचा मुक्काम वाल्हे येथील पालखीतळावर होतो. वाल्हे मुक्कामानंतर दुसर्या दिवशी सकाळी पालखी सोहळा नीरा नदीवरील स्नानासाठी मार्गस्थ होतो आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे पुढील मुक्कामासाठी जातो.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीवर जेजुरीत भंडार्याची उधळण !
जेजुरी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीत आली असता पालखीवर आणि वारकर्यांवर सोन्यासारख्या भंडार्याची उधळण करण्यात आली. यात अवघी जेजुरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ यांच्या जयघोषाने न्हाऊन निघाली होती.

हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !