TMC MLA Humayun Kabir : (म्हणे) ‘बाबरी मशीद बांधण्यापासून रोखले, तर शिरच्छेद करू !

  • मुर्शिदाबाद (बंगाल) येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांची धमकी !

  • आमचे १०० मेले, तर आम्ही ५०० मारू, अशीही दिली धमकी !

मुर्शिदाबाद (बंगाल) : येथील बेलडांगा भागात येत्या ६ डिसेंबरला ‘बाबरी’ नावाच्या मशिदीची पायाभरणी होणार असल्याची घोषणा तृणमूल काँग्रेसचे स्थानिक आमदार हुमायू कबीर यांनी केल्यानंतर आता त्यांनी धमकीही दिली आहे. ‘कुणीही या मशिदीच्या बांधकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर रक्तपात होईल. माझ्या विरोधात कुणी काही करण्याचा प्रयत्न केला, तर मी शिरच्छेद करीन’, अशी धमकी देणारा त्यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात मुसलमानांची  लोकसंख्या अनुमाने ७० टक्के आहे. त्याच पार्श्वभूमीवर कबीर यांनी ही धमकी दिली आहे.

या व्हिडिओमध्ये कबीर असे म्हणत आहे की,

आता आम्ही (मुसलमान) २७ टक्के आहोत, बाबरी मशीद उभी राहीपर्यंत ४० टक्के होऊ. पाहू कोणती शक्ती आम्हाला रोखते ? या बांधकामाच्या वेळी आमचे १०० लोक मारले गेले, तर आम्ही ठरवू की, पलीकडचे ५०० लोक मारले जातील. ही आमची चेतावणी आहे. ही अयोध्या नाही, हे मुर्शिदाबाद आहे. कुणीही या मशिदीला हात लावण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही काय करू शकतो ते दाखवू ?

भाजपने कबीर यांच्या या विधानावर टीका करतांना म्हटले की, तृणमूलला धार्मिक उत्तेजन देत मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे.

संपादकीय भूमिका

  • या धमकीतून हे स्पष्ट होते की, तृणमूल काँग्रेस बंगालला ‘दुसरा बांगलादेश’ बनवण्याची सिद्धता करत आहे. अशी धमकी दिल्यानंतरही कबीर यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा गुन्हाही नोंदवलेला नाही, हे बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात नसल्याचे दर्शवते !
  • ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यानंतर निधर्मीवादयांचा जळफळाट होतो, त्यांना बाबरीसाठी शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांविषयी काहीच वाटत नाही !
  • मुर्शिदाबादमध्ये ७० टक्के मुसलमान आहे. त्यामुळे मुसलमान बहुसंख्य झाल्यावर काय होते ?, हे हिंदूंनी लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र करण्यासाठी कृती करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे !
  • हिंदुत्वनिष्ठांविरुद्ध कथित ‘हेट स्पीच’ची (चिथावणीखोर भाषण केल्याची) तक्रार करणारे आता आमदार हुमायू कबीर यांच्या चिथावणीखोर वक्तव्याविषयी गप्प का ?