
बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांनी ६ डिसेंबर या दिवशी बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली असून त्यासंदर्भात तेथे फलक लावण्यात आले आहेत. कबीर यांच्यात हिंदुद्वेष किती मुरलेला आहे, हे दर्शवणारी घटना म्हणजे त्यांनी जाणूनबुजून अयोध्येतील श्रीराममंदिरावर ध्वजारोहण केले जात असतांना म्हणजे २५ नोव्हेंबर या दिवशीच हे फलक लावले. यामागील त्यांचा उद्दाम हेतू लक्षात न येण्याइतके हिंदू काही दूधखुळे नाहीत. वर्ष १५२८ मध्ये मोगल शासक बाबरने अयोध्येत राममंदिराचा विध्वंस करून बाबरी मशीद बांधली होती. याच बाबराचे वंशज असलेल्या हुमायू कबीर यांनी भारतीय संस्कृती आणि धर्म यांच्यावर पुन्हा एकदा बाबरी मशिदीच्या माध्यमातून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. योगयोगाने बाबराच्या मुलाचे नाव हुमायू होते. ही विध्वंसकता अशीच पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न होणे हे भारतासाठी धोकादायक आहे. अकबर, बाबर, हुमायू यांनी भारताला लुटले. ते जरी आज हयात नसले, तरी त्यांची निशाणी आजही भारतात अस्तित्वात आहे, हे भारताचे दुर्दैवच !
६ डिसेंबर १९९२ या दिवशी श्रीरामजन्मभूमीवरील बाबरीचा ढाचा पाडण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पायाभरणीचा दिवस ६ डिसेंबर हा ठरवण्यात आल्याचे कबीर यांनी सांगितले. अजून एक महत्त्वाची गोष्ट पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आली आहे, ती म्हणजे येत्या ६ डिसेंबरलाच देहलीत मोठा बाँबस्फोटही घडवण्यात येणार होता. बाबरी ढाचा पाडल्याच्या घटनेला यंदा ३३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आतंकवाद्यांनी हे विध्वंसक षड्यंत्र रचले होते. स्फोटासाठीची ६ ठिकाणे देहलीतीलच ठरवण्यात आलेली होती; मात्र गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे हे षड्यंत्र धुळीस मिळाले. असे असले, तरी या सर्वांच्या मागे असलेली जिहादी मानसिकता भारतात तिची पाळेमुळे घट्ट रोवून उभी आहे. ती मुळासकट उपटायला हवी. ही जिहादी मानसिकता आता ‘बाबरी’च्या माध्यमातूनही पुन्हा एकदा समोर आली आहे. बाबरीचा ढाचा जरी उद्ध्वस्त झालेला असला, तरी मुसलमानांच्या मनामनातील ‘बाबरी’ नष्ट व्हायला हवी, अन्यथा भारताचे भवितव्य कठीण असेल !

‘बाबरी’ का नको ?
धर्मनिरपेक्ष भारतात कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थळ उभारण्यास विरोध नाही; पण येथे प्रश्न निर्माण होतो की, बाबरीच का ? बाबराने काय केले ? तर भारतातील सहस्रो आया-बहिणींचे शीलभंग केले. अनेक भारतियांवर क्रूर अत्याचार केले. त्याने भारत घडवला नाही, तर भारत देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. अशा विध्वंसकाच्या नावे, देशाचा कट्टर शत्रू असलेल्याच्या नावाने मशिदीची उभारणी का ? अनेक मुसलमानांनीही बाबराला विरोध केला आहे. मग तरीही ‘बाबरी’च का ? राष्ट्रनिष्ठ मुसलमान आतातरी याला विरोध करतील, अशी अपेक्षा बाळगूया.
आजवर अनेक मशिदींमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. अनेक मशिदींत अवैध व्यवहार केल्याचेही समजते. मग असे असतांना पुन्हा एका मशिदीची उभारणी का ? त्यातही ती ‘बाबरी’ असल्याने तिच्या माध्यमातून राष्ट्रघातकी कारवायांचे कटकारस्थान रचले जाणार नाही कशावरून ? हीच ‘बाबरी’ भारतासाठी विध्वंसक ठिणगी ठरल्यास त्याला उत्तरदायी कोण ? बाबरीच्या आताच्या उभारणीमागील कारस्थान काय आहे, हे सर्वच जण जाणत आहेत. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतपेटीवर डोळा ठेवून बाबरी उभारण्याचा घाट घातला जात आहे. मुसलमानांची सर्वाधिक मते मिळावीत, हा त्यामागील हेतू आहे. अयोध्येतील बाबरी जरी नष्ट झाली असली, तरी बंगालमध्ये बाबरीच्या माध्यमातून मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा प्रकार होत आहे. अशांच्या दृष्टीने बाबर ‘हिरो’ (नायक) आहे. ते बाबराला शत्रू मानत नाहीत. त्यामुळे बंगालमध्ये बाबरीच्या पायाभरणीची सिद्धता मोठ्या प्रमाणात चालू आहे. अशा नावाची मशीद उभारणे म्हणजे एका देशद्रोह्याला उघडउघड पाठिंबा दिल्यासारखेच आहे. असा पाठिंबा देणारे एक राज्य भारतात असणे, हे भारतासाठी चिंताजनक आहे. बंगालमधील सध्याची राजवट पहाता तेथे जंगलराज निर्माण झाले आहे. अल्पसंख्यांकांचे तळवे चाटण्याचे आवडते काम करणार्या ममता बॅनर्जी यांच्या राज्यात ‘बाबरी’ उभी रहाणार आहे. त्यामुळे उद्या बंगालचे दुसरे ‘काश्मीर’ झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. ही स्थिती उद्भवू नये, यासाठी सर्वच राज्यांनी बंगालला कडाडून विरोध केला पाहिजे. केंद्र सरकारने तेथील ‘ममता’मय राजवट हटवून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि ममता यांना बांगलादेशात हाकलून लावावे, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते.
राष्ट्रप्रेमींना आवाहन !
‘बाबरी’च्या उभारणीला रामभक्त आणि हिंदू यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोधही होत आहे. ‘अयोध्येत बाबरीच्या जागी राममंदिर उभे राहिले, त्याप्रमाणे बंगालमध्येही आम्ही राममंदिर उभारू’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. भविष्यात ‘बाबरी’ होती, आहे आणि राहील’, असे म्हणणार्या हिंदुद्वेष्ट्यांना हिंदूंनी ‘बाबरी’ होती, गाडली गेली आणि नष्ट झाली’, अशा शब्दांत सामाजिक माध्यमांवर प्रत्युत्तर दिले आहे. काही हिंदूंनी तर ‘बाबरी उभारूनच दाखवा. ती पुन्हा तोडण्यासाठी आमचे हात शिवशिवत आहेत’, असेही सामाजिक माध्यमांवर म्हटले आहे. थोडक्यात काय, तर ‘बाबरी’चा ‘ब’ उच्चारण्याचेही कुणाचे धाडस होऊ नये, अशी पत आणि धाक हिंदूंनी निर्माण करायला हवा. असे केले, तरच हिंदूंच्या जखमांवर वारंवार मीठ चोळण्याचे जे प्रकार घडतात, ते थांबतील. ‘आताचा काळ आक्रमणे झेलण्याचा नाही, तर आक्रमणे परतवून लावण्याचा आहे’, हे वरील प्रतिक्रियांतून ‘बाबरी’ समर्थकांनी लक्षात घ्यावे.
‘बाबरी’ ज्या भूमीवर उभारण्याचा कबीर यांनी प्रयत्न चालवला आहे, ती भूमी शेतकर्याची आहे. कबीर यांचा त्या भूमीवर काहीही अधिकार नाही. त्यामुळे तेथील स्थानिक शेतकरी बांधवांनी बाबरीला कडाडून विरोध केला आहे. शेतकर्यांच्या संघटितपणाचे कौतुक करायला हवे. संबंधित भूमीच्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाल्यापासून कबीर हे संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहेत. अशा प्रकारे बाबराच्या वंशजांना पळता भुई थोडी करण्यासाठी हिंदूंनी पुन्हा एकदा कंबर कसायला हवी. अयोध्येतील रामजन्मभूमीला वाचवण्यासाठी अनेकांनी शतकानुशतके संघर्ष केला. पराक्रमी राजे, साधूसंत आणि सामान्य जनता यांनी तन, मन अन् धन यांचा त्याग केला. हा आदर्श समोर ठेवून नव्याने उभारल्या जाणार्या ‘बाबरी’ला विरोध करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य होय !
| ‘बाबरी’चा ‘ब’ उच्चारण्याचेही कुणाचे धाडस होऊ नये, अशी पत आणि धाक हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक ! |
संपादकीय : बंगालमधील कालचक्र !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !