महाराष्ट्र मंदिर महासंघाने निवेदन देऊन केली होती बंदीची मागणी

पंढरपूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये पंढरपूर शहरात १५ ते २९ जुलै या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल, तसेच मांसजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू केली आहे. आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात येत असल्याने कायदा अन् सुव्यवस्था, तसेच धार्मिक वातावरण कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने यापूर्वी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. (अशी निवेदने का द्यावी लागतात ? – संपादक)
याशिवाय मानाच्या पालख्यांचा मुक्काम होत असल्याने करकंब, पांढरेवाडी, व्होळे, देवडे आणि खेडभोसे या गावांमध्ये २० ते २५ जुलै या कालावधीत वरीलप्रमाणे बंदी लागू करण्यात आली आहे. विविध सामाजिक, राजकीय संघटना, तसेच भाविक यांच्याकडून अशी मागणी करण्यात आली होती.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !