
कराड, १४ जुलै (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील मूर्तीकारांसमोर निर्माण झालेला जागेचा प्रश्न सुटला आहे. बालाजी मंदिरासमोरील पालिकेच्या मैदानात या वर्षीही मूर्तिकारांना जागा (शेड) उभारण्याची अनुमती मिळाल्याने १२ जुलैला प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला.
बालाजी मंदिराच्या लगत असणार्या मोकळ्या जागेत कराड नगरपालिकेकडून ‘ड्रेनेज पंपिंग स्टेशन’चे (मल वाहिन्यांतील पाणी खेचणारी यंत्रणा)) बांधकाम चालू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे मैदानात जाणारा मार्ग बंद झाला होता. आता श्री गणेशमूर्ती कुठे निर्माण करायच्या ? असा प्रश्न मूर्तीकारांना पडला होता. गणेशोत्सव अवघ्या २ मासावर येऊन ठेपल्याने सर्व मूर्तीकार चिंतेत होते. नगरसेविका तेजश्री पाटसकर, सुदर्शन पाटसकर आणि मूर्तीकार यांनी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची भेट घेऊन तातडीने मैदान देण्याची किंवा पर्यायी जागा देण्याची विनंती केली. या मागणीची गंभीर नोंद घेत पंपिंग स्टेशनच्या खोदकामालगतचा मार्ग मोकळा करून देण्यात आला. त्यामुळे बालाजी मंदिर समोरील मैदान पुन्हा मूर्तीकारांसाठी उपलब्ध झाले आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप