
नाशिक – इगतपुरीजवळ भावली धरण येथे पर्यटनासाठी एका कुटुंबातील ८ सदस्य गेले होते. तिथे आलेल्या ८ ते १० जणांच्या गुंड टोळक्याने त्या कुटुंबातील महिलेची छेड काढत काही टिपण्या केल्या. त्यानंतर तिने, तसेच तिचा पती आणि दीर यांनी त्या टोळक्याला जाब विचारला. त्यावरून वाद चालू होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे ते कुटुंब तेथून गाडीत बसून नाशिकच्या दिशेने निघू लागले, तेव्हा या टोळक्याने त्यांचा पाठलाग चालू केला आणि त्यांच्या गाडीवर स्टंप, बॅट आदींनी आक्रमण करून गाडीची हानी करण्याचा प्रयत्न केला. १५ ते ३० कि.मी. गाडीचा पाठलाग केला. एके ठिकाणी वाहतूककोंडीत गाडी अडकल्यावर त्या टोळक्याने तेथेही त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यातील एक जण गाडीला लटकल्याने त्यांना गाडीचा वेगही वाढवता येईना. या जीवघेण्या थरारानंतर त्या कुटुंबाने नाशिक गाठून पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी ९ आरोपींवर प्रथम दर्शनी अहवाल नोंद करून त्यांना कह्यात घेतले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच