
वसई – तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध विभागाचे (‘एफ्.डी.ए.’चे) अधिकारी असल्याची बतावणी करत वसईतील एका मिठाईच्या दुकानाच्या मालकाला धमकी देऊन ६ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी आणि बनावट सरकारी अधिकारी बनून धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २३ जून या दिवशी दुकानात येऊन बनावट अधिकार्याने दुकानातील खाद्यपदार्थ आणि मुदतबाह्य वस्तूंचे सूत्र उपस्थित केले. त्यानंतर दुकान बंद करणे, गुन्हा नोंद करणे आणि माध्यमांमध्ये अपकीर्ती करण्याची धमकी दिली आणि पैसे उकळले.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी