हॉटेलवर कारवाई करणार्‍या पोलिसाचे निलंबन रहित !

पुणे – डेक्कन जिमखाना परिसरातील हॉटेलवर केलेल्या कारवाईप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांचे निलंबन रहित केले असून त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांनी कारवाई केलेल्या संबंधित हॉटेलवर पोलिसांनी यापूर्वी ६ गुन्हे नोंद केले होते; मात्र तरीही ते हॉटेल चालू होते. संदीप कदम यांनी केलेल्या कारवाईत त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले. आढावा बैठकीतील या निष्कर्षानंतर कदम यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.