आयुर्वेदीय उपाय आणि पारंपरिक ज्ञान प्रमाणित होत नाही, तोपर्यंत वापरायचेच नाही का ? – डॉ. संजय देशमुख, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

आंतरिक क्षमतेला प्राधान्य देऊन शिकता आले पाहिजे. त्यादृष्टीने नवे शैक्षणिक धोरण लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी येथे केले.

दैनंदिन वापरातील कपड्यांना ऊन दाखवून (उन्हात ठेवून) त्यांची आध्यात्मिक शुद्धी करा !

समस्त विश्‍वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! उन्हात कपडे ठेवल्याने सूर्याची तेजोमय अन् चैतन्यमय किरणे त्यांवर पडतात. यामुळे कपड्यांतील रज-तमात्मक स्पंदने नाहीशी होऊन कपडे सकारात्मक स्पंदनांनी भारित होतात.

आयुर्वेद औषध ‘आयुष-६४’च्या क्लिनिकल चाचणीमध्ये ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाबाधितांवर आयुर्वेदाचे औषध असणार्‍या ‘आयुष-६४’चे परिणाम समोर आले आहेत. ३० पैकी २१ म्हणजे ७० टक्के रुग्ण ५ दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले. ही चाचणी जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेकडून करण्यात आली.

आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता : पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवलेल्या औषधी वनस्पतींचा संग्रह करा ! (भाग १)

भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. क्रमशः प्रसिद्ध होणार्‍या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, हे समजून घेऊया.

उन्हाचे उपाय केल्याने (अंगावर ऊन घेतल्याने) व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘उन्हाचे उपाय करणे’ (अंगावर ऊन घेणे) या संदर्भात सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत . . .

कोरोनाच्या पश्‍चात उद्भवणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद, योग आदींचा मोठा हातभार ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री

कोरोनाच्या पश्‍चात उद्भवणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद, योग आणि तत्सम उपाचारपद्धती यांचा जगाला मोठा हातभार लागत आहे.

आयुर्वेदीय वैद्यांना नाक, कान, गळा, डोळे, दात आणि हाडे यांच्यावर शस्त्रकर्म करण्याची केंद्र सरकारची अनुमती

केंद्र सरकारने आयुर्वेदीय वैद्यांना आता शस्त्रकर्म करण्याची अनुमती दिली आहे. आयुर्वेदातील पदव्युत्तर विद्यार्थी हे शस्त्रकर्म करू शकणार आहेत. भारतीय वैद्यकीय परिषदेने मात्र सरकारच्या या निर्णयाचा प्रखर विरोध केला आहे.

लसीची प्रतिक्षा…!

‘भारतीय संस्कृतीने दिलेला औषधांचा, आहार-विहाराचा आणि धर्माचरणाचा अनमोल ठेवा कोरोनासारख्या संकटात संयमी भारतियांच्या कामी आला’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येणार्‍या काळात ‘कोरोनापेक्षा कितीही भयंकर विषाणू आले, तरी भक्तीचे शस्त्र त्याला सर्व औषधे उपलब्ध करून देईल’, ही श्रद्धाच भारतियांना यापुढेही तारून नेईल !

आरोग्य आणि आयुर्वेद यांची सांगड घाला !

आयुर्वेदाने सांगितलेले नियम समजून घेऊन त्याप्रमाणे आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या आखल्यास ‘जीवेत शरदः शतम् ।’ याप्रमाणे १०० वर्षे  आरोग्यसंपन्न आयुष्य जीवन जगा, हा आयुर्वेदीय ऋषीमुनींचा आशीर्वाद प्रत्येकाला निश्‍चितच मिळेल.

‘रोग होऊ नयेत’ म्हणून आयुर्वेदाने सुचवलेले उपाय

मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवणे अन् काम, क्रोध इत्यादी आवेगांचे नियंत्रण करणे. खोकला, शौच, लघवी आदी नैसर्गिक वेग दाबून न धरणे. आरोग्यासाठी हितकर आहार-विहार करणे