उन्हाचे उपाय केल्याने (अंगावर ऊन घेतल्याने) व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सध्या बहुतेकांना अल्प-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास (टीप) असतो. तसेच वातावरणात रज-तमाचे प्रमाण पुष्कळ वाढल्याने व्यक्तीचा देह, मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येते. यांमुळे तिला विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागते. उन्हाचे उपाय केल्याने (अंगावर ऊन घेतल्याने) व्यक्तीच्या भोवती निर्माण झालेले त्रासदायक स्पंदनांचे आवरण न्यून होण्यास साहाय्य होते. उन्हाचे उपाय केल्याने व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १३.११.२०२० या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

​या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांनी २० मिनिटे उन्हाचे उपाय केल्यावर त्यांच्यावर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – उन्हाचे उपाय केल्यावर चाचणीतील दोन्ही साधकांवर झालेला परिणाम : पुढे दिला आहे.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली –

१. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये उपायांपूर्वी ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात होत्या. त्याने उन्हाचे उपाय केल्यावर त्याच्यातील दोन्ही नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाल्या आणि त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने उन्हाचे उपाय केल्यावर त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

सौ. मधुरा कर्वे

२. निष्कर्ष

​उन्हाचे उपाय केल्याचा चाचणीतील दोन्ही साधकांवर सकारात्मक परिणाम झाला.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. उन्हाचे उपाय केल्याने चाचणीतील दोन्ही साधकांना आध्यात्मिक लाभ होणे : सूर्यदेव आरोग्य देतो. यामुळेच ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् ।’ म्हणजे ‘सूर्यदेवाकडे आरोग्य मागावे,’ असे सांगितले आहे. शरीर निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन अंगावर ऊन पडणे आवश्यक असते. ऊन अंगावर घेतांना ते ऋतूंनुसार अंगावर ऊन घेण्यासंबंधीचे नियम पाळून घ्यावे. प्रतिदिन योग्य प्रमाणात अंगावर ऊन घेतल्याने शरिरात वाढलेले दोष (रोगकारक द्रव्ये) दूर होण्यास साहाय्य होते. उन्हाचे उपाय केल्याने व्यक्तीचे देह, मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर होण्यास साहाय्य होते. यामुळे व्यक्तीचे शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास न्यून होऊन तिचे आरोग्य सुधारते. चाचणीतील साधकांनी उन्हाचे उपाय केवळ १ दिवस २० मिनिटे केल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. यातून ‘उन्हाचे उपाय करणे आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायी आहे’, हे सिद्ध होते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.११.२०२०)

ई-मेल : [email protected]

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक