‘रोग होऊ नयेत’ म्हणून आयुर्वेदाने सुचवलेले उपाय

१. प्रज्ञापराध होऊ न देणे

२. मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवणे अन् काम, क्रोध इत्यादी आवेगांचे नियंत्रण करणे. खोकला, शौच, लघवी आदी नैसर्गिक वेग दाबून न धरणे

३. आरोग्यासाठी हितकर आहार-विहार करणे

४. वसंत ऋतूत कफ वाढू नये; म्हणून उलटी करणे, शरद ऋतूत पित्त वाढू नये म्हणून रेचक घेणे, पावसाळ्यात वात वाढू नये म्हणून एनिमा घेणे

. देश-कालाप्रमाणे दिनचर्या आणि ऋतूचर्या आखावी

६. प्रत्येक कृती विचारपूर्वक करणे

७. विषयांविषयी आसक्ती न ठेवणे

८. दान करणे, दुसर्‍यास साहाय्य करणे

९. सत्य बोलणे, तप आणि योगसाधना करणे

१०. आप्तांची (ज्ञान प्राप्त झालेले) सेवा करणे, त्यांच्या उपदेशाने वागणे

११. अध्यात्माचे चिंतन करणे आणि त्याप्रमाणे वागणे

१२. सद्वर्तन करणे, सर्वांशी स्नेहभावाने आणि समतेने वागणे

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘घनगर्जित’, मे २०११)