आंध्रप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करून ६९९ ‘ख्रिस्त गावे’ बनवणार्‍या पाद्रयाला अटक

ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात असे पाद्री निपजणे, याहून वेगळे काय घडणार ? हिंदु शासनकर्ता असलेल्या राज्यांत कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर होते का ? उलट कुणी हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश केला, तर त्यालाही विरोध केला जातो !

आंध्रप्रदेशामधील मंदिरांवरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजप आणि तेलुगु देसम् यांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !

मालवणी (मुंबई) येथील शेकडो हिंदु परिवारांचे धर्मांधांच्या दहशतीमुळे पलायन !

हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !

राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारीपासून चालू होणार ! – वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच चालू झाले असून येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा चालू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ जानेवारी या दिवशी दिली.

पेरीड (जिल्हा कोल्हापूर) गावात ग्रामपंचायतीसाठी शून्य टक्के मतदान !

शाहूवाडी तालुक्यातील पेरीड ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली ६८ वर्षे गावात निवडणूक झालेली नाही. यंदा ९ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी निवडणूक झाली. यामुळे बिनविरोध परंपरा मोडीत निघणार म्हणून गावातील एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.

पुण्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते १६ जानेवारी या दिवशी येथील कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू झाली. पुणे जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ३१ केंद्रांवर ३ सहस्र १०० जणांना लस देण्यात आली.

रुग्णालयातील उपकरणांच्या देखभालीकडे चेन्नई येथील आस्थापनाचे दुर्लक्ष !

उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात १० नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागलI.

अधिकार्‍यांच्या स्थानांतराचा डॉ. लहाने यांनी घेतलेला निर्णय ‘मॅट’कडून रहित

डॉ. आनंद यांना १६ जानेवारीपर्यंत पुन्हा मूळ पदावर नियुक्त करण्याचा आदेशही न्या. ए.पी. कुर्‍हेकर यांनी दिला आहे.

मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणार्‍या महिलेच्या अधिवक्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या

‘एका कारागृहात नसतील तितक्या व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत’,- आमदार नीलेश राणे

१४ मेपर्यंत क्रीडा संकुलाचे काम आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार !

छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार.