जनभावनांचा आदर करून मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला एका गटाचा विरोध होता आणि हा गट इतरांची दिशाभूल करत होता. आयआयटी प्रकल्पाचे लाभ सांगूनही लोकांना ते पटले नसल्याने शासनाला आता तेथील प्रकल्प रहित करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे धर्मांधाकडून भीम आर्मीच्या नेत्याची हत्या

गावकर्‍यांनी जाळले धर्मांधाचे घर !
बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने !
‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे या घटनेविषयी काही बोलतील का ?

आजपासून देशभरात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अनुमाने ३ लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाईल. रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत, यासाठी जानेवारीत एकूण १० दिवसच लसीकरण होईल.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे; मात्र अनेक तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

सोयीसुविधांच्या अभावी खैरी (जिल्हा वर्धा) येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

ग्रामस्थांना इतकी वर्षे सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत ? याचा शासन-प्रशासन यांनी विचार करावा !

२५ जानेवारीपासून गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन

२५ ते २९ जानेवारी या कालावधीत गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन होणार आहे. २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन असल्याने या दिवशी विधानसभेचे कामकाज होणार नाही.

जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियान

वाहनचालकांसह नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे.

राज्यातील शाळा बंद असतांना शाळांसाठी स्वयंपाकघर साहित्याच्या खरेदीसाठी ७८ कोटींची निविदा प्रक्रिया

निधीची चणचण असतांना आणि शाळा बंद असतांना ताटवाटयांची खरेदी कशासाठी ?

वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले

वर्षा राऊत यांनI आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे

धनंजय मुंडेंच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार प्रविष्ट