१४ मेपर्यंत क्रीडा संकुलाचे काम आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार !

इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी यांची चेतावणी

क्रीडा संकुलासमोर निदर्शने करतांना इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी

कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचे काम अद्यापही अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. गेली कित्येक वर्षे या क्रीडा संकुलाचे काम अत्यंत संथ गतीने होत. याच समवेत या संकुलाला छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, असे नामकरण करण्यास दीर्घकाळ विलंब होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने १६ जानेवारी या दिवशी इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी यांनी क्रीडा संकुलासमोर निदर्शने केली. १४ मेपर्यंत क्रीडा संकुलाचे काम आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली. या वेळी कोल्हापूर शहर आणि जिल्हा छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल नामकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.