पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेत ४३७ कोटी रुपयांची विकासकामे संमत
यात विविध विकासकामांच्या व्ययासमवेत तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकासविषयक कामांना अनुमाने ४३७ कोटी रुपयांच्या व्ययास स्थायी समितीने संमती दिली आहे.
यात विविध विकासकामांच्या व्ययासमवेत तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकासविषयक कामांना अनुमाने ४३७ कोटी रुपयांच्या व्ययास स्थायी समितीने संमती दिली आहे.
सांडपाण्याच्या सहवासात वाढणारी झाडे आणि भाज्या यांच्या मुळांमधून सांडपाण्यातील विषारी घटक शोषले जातात. त्यामुळे ती फळे आणि भाज्या खाण्यास अयोग्य असतात.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारतीय दंड संहिता कलम ३७७ नुसार समलैंगिक विवाह हा अपराध मानण्यात येत होता. त्यासाठी १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती; मात्र ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात समलैंगिक विवाह हा अपराध नसल्याचे सांगितले होते.
अशा प्रकारांमध्ये राष्ट्रपती नव्हे, तर राज्य सरकारला अधिकार असल्याने या अभियानाची योग्य फलनिष्पत्ती मिळण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी राज्य सरकारकडे याविषयी मागणी लावून धरणे अपेक्षित आहे !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.
येथील शाहूपुरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून ५० जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्णही करता येणार नाही. सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
रेल्वे अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य आतंकवादी आक्रमणे आणि भूकंप यांच्यापासून बचावासाठी पुलामध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असेल. पुलाची एकूण लांबी १ सहस्र ३१५ मीटर असणार आहे.