कर्नाटकातील भटकळ येथील पोलिसांची मोगलाई !
हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केल्यावर मुसलमानाला अटक

भटकळ (कर्नाटक) – एका व्यापारी संकुलामध्ये काम करणार्या हिंदु तरुणीचे त्याच संकुलात काम करणार्या मुसलमान विक्रेत्याने (‘सेल्ममॅन’ने) अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला. या प्रकरणात पोलिसांनी मुसलमानावर कारवाई करण्याऐवजी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी दबाव आणल्यानंतर पोलिसांनी मुसलमानाला अटक केली.
In a shocking display of biased policing in Bhatkal, Karnataka, Police registered cases against the very Hindutva activists who rescued a kidnapped Hindu girl.
Instead of taking immediate action, the police arrested the perpetrator, only after massive protests by the activists.… pic.twitter.com/el1kY5k4V2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2026
१. शहरातील एका व्यापारी संकुलामध्ये मारुकेरी भागातील एक हिंदु तरुणी काम करत होती. त्याच संकुलात कारगद्दे येथील शाहिद खान हा विक्रेता म्हणून कामाला होता.
२. १७ जून या दिवशी ‘मला तुझ्याशी तातडीने बोलायचे आहे, बाहेर जाऊया’, असे सांगून खाने याने तरुणीला बलपूर्वक चारचाकी वाहनामध्ये बसवून सागर शहराच्या दिशेने वेगाने गाडी नेली.
३. सागर रस्त्यावरील निर्मनुष्य भागाकडे संशयास्पदरित्या चारचाकी जात असल्याचे पाहून हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी तरुणीची सुटका केली आणि शाहिद खान याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
४. पोलिसांनी आरोपी शाहिद खानवर कोणतीही कारवाई करण्याऐवजी तरुणीची सुटका करणार्या २ हिंदु कार्यकर्त्यांविरुद्धच गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या या कृतीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
५. पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेचा निषेध करत भाजप आणि विविध हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी १७ जूनच्या रात्री भटकळ शहर पोलीस ठाण्यासमोर जमून धरणे आंदोलन केले.
६. आंदोलनाची तीव्रता वाढताच खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी अन्वेषणाला आरंभ केला. पीडित हिंदु तरुणीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन शाहिद खानविरुद्ध लेखी तक्रार दिली. ‘माझ्या इच्छेविरुद्ध बलपूर्वक मला चारचाकी वाहनात डांबण्यात आले’, असे तिने तक्रारीत नमूद केले.
७. तरुणीची तक्रार प्रविष्ट (दाखल) होताच पोलिसांनी शाहिद खानला अटक केली.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !