शाळा प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न !

पुणे – येथील फुरसुंगी भागातील ‘विबग्योर स्कूल’मध्ये इयत्ता दहावीत शिकणार्या एका हिंदु विद्यार्थिनीवर धार्मिक प्रभाव टाकून तिचे धर्मांतर करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. नेहमीप्रमाणे शाळा प्रशासनाने हा संवेदनशील प्रकार दडपून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु पीडित मुलीच्या पालकांनी ‘पालक ग्रूप’वर आवाज उठवल्यामुळेख्रिस्ती मिशनर्यांचा डाव उधळला गेला. ‘डीसीएन् न्यूज’ने हे वृत्त प्रसारित केले आहे.
🚨 Derecognize Schools Involved in Religious Indoctrination! 🚨
Alarming reports from Vibgyor School, Phursungi (Pune): Claims of an attempted student conversion by a staff member, compounded by allegations of a cover-up by the school management. 🏫⚠️
For years, concerns have… pic.twitter.com/e810H0UcWs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2026
आजारपणाचा अपलाभ घेऊन ‘बायबल’चे डोस !
तक्रारदार पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी वर्गात असतांना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ती उपचारांसाठी शाळेच्या ‘सिक बे’मध्ये (वैद्यकीय कक्षात) गेली होती. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या ख्रिस्ती कर्मचार्याने तिला प्रथमोपचार किंवा वैद्यकीय साहाय्य देण्याऐवजी थेट ख्रिस्ती धर्म, येशूवरील श्रद्धा आणि धर्मांतर यांविषयी सांगण्यास प्रारंभ केला. त्या कर्मचार्याने स्वतः हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती धर्म कसा स्वीकारला ? आणि चर्चमध्ये गेल्यामुळे त्याच्या आयुष्यात कसा पालट झाला ?, हे सविस्तर सांगितले. ‘येशूची प्रार्थना केल्याने तुझ्या सर्व समस्या दूर होतील’, असे सांगून कोवळ्या वयाच्या हिंदु विद्यार्थिनीचा बुद्धीभेद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
‘या संभाषणाविषयी घरी आईला काहीही सांगू नकोस’, अशी सक्त ताकीद हिंदु विद्यार्थिनीला दिली आणि एका ख्रिस्ती ‘यू ट्यूब इन्फ्लुएन्सर’चे व्हिडिओ पहाण्याचा सल्ला देत त्या चॅनेलचे नाव एका चिठ्ठीवर लिहून मुलीच्या हातात दिले.
शाळा प्रशासनाचा ढोंगीपणा !
‘विबग्योर स्कूल’ प्रशासनाने तक्रार मिळाल्याची निश्चिती केली असून ‘संबंधित कर्मचार्याची अंतर्गत चौकशी चालू आहे’, असे मोघम उत्तर दिले; मात्र पालकांनी आता शाळा प्रशासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (आंतरराष्ट्रीय आणि ‘कॉन्व्हेंट’ शाळांमधून हिंदु विद्यार्थ्यांचे पद्धतशीरपणे ख्रिस्तीकरण करण्याचे आणि त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी न्यूनगंड निर्माण करण्याचे षड्यंत्र गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. अशा शाळांची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ कठोर शिक्षा केली पाहिजे. – संपादक)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !