
मुंबई – हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित लोकलमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी आणि प्रवाशांना आकर्षित करणारी पत्रके चिकटवण्यात आली आहेत. या पत्रकांवर ‘जीवनरेखा हवी आहे का ?’, ‘येशू देव आहे’, ‘तुम्हाला प्रेम करण्यासाठी बनवले होते’ अशा भावनिक आणि मानसिक दबावात असलेल्या व्यक्तींना आकर्षित करणार्या मथळ्यांचा वापर या पत्रकांमध्ये करण्यात आला आहे. माणसाच्या वैयक्तिक अडचणी, नोकरी जाणे, कौटुंबिक समस्या आणि मानसिक थकवा यांचा अपलाभ घेऊन ‘केवळ येशूच तुम्हाला वाचवू शकतो’, अशा आशयाचा प्रचार या पत्रकांद्वारे केला जात आहे.

‘www.ThisLoveStory.org’ या संकेतस्थळाचा पत्ता देऊन प्रवाशांना अधिक माहितीच्या नावाखाली जाळ्यात ओढण्याचा थेट प्रयत्न चालू आहे.
अशी पत्रके कुणी लावतांना दिसल्यास तात्काळ नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. या प्रकरणात कुणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !