जिल्हा बनावट डॉक्टर मुक्त करण्याचा आदेश

दावणगेरे (कर्नाटक) – जिल्ह्यातील बनावट डॉक्टरांच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यदल समितीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, असा आदेश येथील उपविभागीय अधिकारी संतोष कुमार यांनी दिला. उपविभागीय अधिकारी कार्यालयात बनावट डॉक्टरांचा शोध आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयोजित जिल्हा कृती दल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकार्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणार्या बनावट डॉक्टरांना २५ सहस्र रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत दंड अन् ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याचे कायद्यात प्रावधान आहे. जिल्ह्यात गेल्या काही कालावधीत ४० बनावट डॉक्टर आढळले होते. यानुषंगाने ही बैठक घेण्यात आली.
या वेळी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. षण्मुखप्पा, डॉ. मंजुनाथ पाटील, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. योगेंद्र कुमार आणि विविध तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !