५ पर्यटक अद्यापही बेपत्ता

रत्नागिरी – तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले ५ तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे पाचही जण समुद्रात बुडाले असून सध्या ते बेपत्ता आहेत. २० जूनच्या सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समुद्रात बेपत्ता असलेले आदित्य राऊत, यश कांबळे, अनिकेत हिवराळे, प्रेम आदमाने आणि आनंद नरवडे हे सर्व जण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील आहेत.
१. छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्व जण समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी गेले होते. यातील ८ जण समुद्रात पोहोत असतांना सर्व जण प्रवाहामध्ये समुद्रात ओढले गेले.
२. घटनेची माहिती समजताच स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी आले. ३ तरुणांना वाचवण्यात यश आले असून अन्य ५ जण मात्र बेपत्ता आहेत. बोटींच्या साहाय्याने बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
३. समुद्रातील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि उसळत्या लाटा यांमुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा