सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील शहजाद बनला ‘शंकर!’

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील शहजाद नावाच्या एका मुसलमान व्यक्तीने संपूर्ण कुटुंबासह घरवापसी केली आहे. बेहडी गावात रहाणार्या ४० वर्षीय शहजादने स्वत:ची पत्नी आणि मुले यांच्यासह सनातन धर्म स्वीकारला. शहजादचे नवीन नाव ‘शंकर’ ठेवण्यात आले आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याने हा निर्णय स्वत:ची श्रद्धा आणि विश्वास यांच्या आधारावर घेतला आहे.
१. हरिद्वारमध्ये धर्माचार्य अरुण कृष्ण महाराज यांच्या उपस्थितीत शहजाद आणि त्याच्या कुटुंबाने वैदिक परंपरेनुसार सनातन धर्म स्वीकारला.
२. १९ जून या दिवशी शंकर आपल्या कुटुंबासह सहारनपूरला परतला. गावकर्यांनी टिळा लावून आणि हार घालून कुटुंबाचे स्वागत केले. गावात पोचल्यानंतर कुटुबियांनी सर्वप्रथम भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा केली.

३. कुटुंबातील सदस्यांची नावेही पालटण्यात आली आहेत. पत्नी रजियाचे नाव सावित्री, मुलगा रिहानचे नाव रुद्र, मुलगी मुस्कानचे नाव रुक्मिणी आणि दुसरी मुलगी रोजीचे नाव दीक्षा ठेवण्यात आले आहे.
४. शंकरचे म्हणणे आहे की, त्याची आधीपासूनच सनातन धर्मावर श्रद्धा होती आणि तो इस्लामच्या कट्टरपंथी विचारसरणीला कंटाळला होता.
५. शंकरच्या सांगण्यानुसार, तो अनेकदा पूजा-पाठ आणि धार्मिक कार्यक्रम यांमध्ये सहभागी होत असे. त्यामुळे मौलाना (इस्लामचा अभ्यासक) त्याच्याविरुद्ध फतवे काढत असत.
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !
Shri Rammandir Ayodhya : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची समयमर्यादा
Sri Mahakaleshwar Temple : उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराकडे आहे ४७२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि ३०० कोटी रुपयांचे सोने-चांदी !
प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !
संपादकीय : मेकॉले यशस्वी झाला !