आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे ऐतिहासिक यश !
(एफ्.ए.टी.एफ्. म्हणजे फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स, म्हणजेच आर्थिक कृती कार्य दल)

पॅरिस (फ्रान्स) – भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठे यश मिळाले आहे. भारताचे वरिष्ठ ‘आय.ए.एस्.’ अधिकारी विवेक अग्रवाल यांची ‘एफ्.ए.टी.एफ्.’ या जागतिक संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. एखाद्या भारतीय अधिकार्याला या प्रभावशाली जागतिक संस्थेत एवढे मोठे पद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. येथे आयोजित या संस्थेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अग्रवाल हे मध्यप्रदेश ‘कॅडर’चे १९९४ च्या बॅचचे ‘आय.ए.एस्.’ अधिकारी आहेत. ते सध्या भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयात सचिवपदावर कार्यरत आहेत.
🚨 Major Diplomatic Win for India! 🇮🇳
India has secured the Vice Presidency of the (FATF) for the first time, with Union Culture Secretary Vivek Aggarwal appointed to the post.
It would come as no surprise if Pakistan reacts strongly to this development.
The expectation now is… pic.twitter.com/hqcEuwv9Jl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
१. ‘एफ्.ए.टी.एफ्.’चे उपाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै २०२६ ते जून २०२७ पर्यंत असेल. अग्रवाल यांना आर्थिक विषय आणि आंतरराष्ट्रीय नियम यांचा दांडगा अनुभव आहे.
२. ते यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागात अतिरिक्त सचिव राहिले आहेत आणि ‘एफ्.ए.टी.एफ्.’मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.
🔹 India to assume Vice-Presidency of the Financial Action Task Force for the first time
🔹 Vivek Aggarwal, Secretary, @MinOfCultureGoI, appointed Vice-President of FATF for the term of July 2026- June 2027
🔹 The Vice-President of the #FATF is elected by the FATF Plenary from… pic.twitter.com/WAVPfYNl3c
— PIB India (@PIB_India) June 19, 2026
३. या नियुक्तीवर बोलतांना अग्रवाल म्हणाले की, ‘मनी लाँडरिंग’ (काळ्या पैशाला पांढरा करण्याची प्रक्रिया) आणि आतंकवाद यांना मिळणार्या निधीविरुद्धच्या भारताच्या सशक्त धोरणांना मिळालेली ही पावती आहे.
४. जागतिक आर्थिक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी आपण काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
५. अलीकडच्या वर्षांत आर्थिक सुरक्षा आणि डिजिटल पेमेंट प्रणाली यांविषयी भारताच्या उत्तम कामगिरीमुळे जगाचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !