राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा भोंगळ कारभार !

नागपूर – राष्ट्रीय परीक्षा संस्थेने २१ जून या दिवशी होणार्या ‘नीट’ फेरपरीक्षेपूर्वी नागपूरच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर संयुक्त अरब अमिरातीमधील अबूधाबी हे परीक्षा केंद्र दिल्याचे उघड झाले आहे. अब्दुल्लाह असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याने फेरपरीक्षेसाठी दिलेल्या अर्जात नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडले होते. केवळ एक दिवसांत पारपत्र आणि व्हिसा यांची प्रक्रिया कशी होणार ?, हा प्रश्न असल्याने विद्यार्थी आणि त्याचे पालक चिंतेत आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीतीही विद्यार्थ्याने व्यक्त केली. पालकांनी तातडीने संस्थेच्या साहाय्य क्रमांकावर तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. संबंधित अधिकार्यांनी तांत्रिक चूक झाल्याचे मान्य करून पडताळणीनंतर सुधारित प्रवेशपत्र देण्याचे आश्वासन दिले आहे. माजी शिक्षणमंत्री डॉ. अनीस अहमद यांनी या प्रकरणी तीव्र खेद व्यक्त केला आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी